Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीमाकडाने लंपास केलेली एक लाखाची पर्स साहसी ट्रेकर्समुळे मिळाली

माकडाने लंपास केलेली एक लाखाची पर्स साहसी ट्रेकर्समुळे मिळाली

बेळगाव येथील शिक्षिकेची पर्स परत मिळवून देणार्‍या ट्रेकर्सचे महाबळेश्‍वरमध्ये कौतुक
भेकवली: बेळगावहुन महाबळेश्वर येथे सहलीसाठी आलेल्या शिक्षिकेच्या हातातील एक लाख रुपये रक्कम असलेली पर्स माकडाने पळवून नेल्याने एकच गोंधळ झाला. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील स्थानिक ट्रेकर्स यांनी खोल दरीत उतरून यांना ही पर्स मिळवून दिल्याबद्दल श्री क्षेत्र महाबळेश्वर चे स्थानिक साहसी ट्रेकर्स जयवंत बिरामने व अनिल लांघी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेली बेळगाव येशील एका हायस्कुलची सहल ऑर्थरसिट जवळ असणार्‍या एल्फिस्टन पॉइंट येथे फिरायला आल. सहलीचा आनंद घेत असतानाच दरम्यान येथे आलेल्या माकडाने एका शिक्षिकेच्या हातातील रोख रक्कम असलेली पर्स पळवली या अचानक झालेल्या या प्रकाराने तेथे एकच गोंधळ झाला. इतर शिक्षकांनी माकडाला हुसकाऊन पर्स मिळवण्याचा प्रयत्न केला पण तो पर्यंत माकड पर्स घेऊन दरीच्या दिशेने पसार झाले. पर्स मध्ये मुलांचे सहलीचे एक लाख रुपये असल्याने शिक्षिकेला रडू कोसळलं.
या घटनेची माहिती येथील स्थानिक व्यावसायिक आनंद पवार यांना समजताच त्यांनी लगेच यांची माहिती श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील स्थानिक ट्रेकर्स जयवंत बिरामने आणि अनिल लांघी यांना दिली. सायंकाळी सहा वाजता घटनेच्या ठिकाणी पोहचून दोरखंडाच्या साह्याने खोल दरीत उतरून त्यांनी एक पाचशे आणि एक शंभर रुपयाचा बंडल शोधून आणले. शिक्षिकेच्या हातात पैसे दिल्या नंतर आणखी एक दोन हजार रुपयांचा बंडल असल्याचे सांगितले पण अंधार झाल्याने दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजता पर्यटकांची गर्दी होण्याअगोदर पुन्हा खोल दरीत उतरुन दोन हजाराचा बंडल शोधून काढण्यात त्यांना यश आलं. ज्या ठिकाणी या सहल थांबली होती त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधून ते पैसे त्यांच्या स्वाधीन केलं. पैसे मिळाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. त्या सर्वांनी साहसी जवान यांचे त्यांनी आभार मानले. यामुळे महाबळेश्वर येथे या साहसी ट्रेकर्स जयवंत बिरामने, अनिल लांघी, रजत बिरामने यांचे कौतुक होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular