Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीउपेक्षित व दुर्लक्षितांच्या विकासासाठी दानशूर व्यक्तीनी पुढे येण्याची आवश्यकता : पो.नि.प्रताप...

उपेक्षित व दुर्लक्षितांच्या विकासासाठी दानशूर व्यक्तीनी पुढे येण्याची आवश्यकता : पो.नि.प्रताप पोमण

फलटण: समाजातून नेहमीच उपेक्षित व दुर्लक्षित राहिलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या विकासासाठी व मदतीसाठी समाजातील दानशुर व्यक्तीनी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे मत फलटण शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी व्यक्त केले. ते महात्मा शिक्षण संस्था संचलित मुकबधिर विधालयामार्फत जागतिक अंपग सप्ताहा निमित्त आयोजित केल्या विविध स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, कमिन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री.गायकवाड, फलटण नगर परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती अजय माळवे, पत्रकार प्रा. रमेश आढाव, कार्यकारी संपादक रोहित अहिवळे, विशाल शहा, सुधिर अहिवळे, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, अध्यक्ष श्री विनोद हाके इ.मान्यंवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे पोमण म्हणाले की, आज दिव्यांग व्यक्तीला दिल्या जाणारे सोयी सुविधा समाजातील काही अपप्रवृती घेवू पहात आहेत त्या गोष्टिला पायबंद घालून त्या सोयी सुविधा अपंगा पर्यंत पुरविल्या गेल्या पाहिजेत ते काम महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चालू असून निसर्गाचा सानिध्यात येथे अपंग मुलांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पुनर्वसन करण्याचा वसा या संस्थेने उचलला आहे. हि बाब निश्चितच उल्लेखनीय अशीच असल्याचे पोमण म्हणाले.
यावेळी बोलताना कमिन्सचे वरिष्ठ अधिकारी श्री.गायकवाड म्हणाले की, हि संस्था अपंग मुलांना दहावी पर्यंत या ठिकाणी शिक्षण देत आहे. हि बाब खरोखरच प्रशंसनीय अशीच असून या ठिकाणी काम करणारे संस्थेचे पदाधिकारी व येथील शिक्षक यांचे या कामी मोठे योगदान आहे. अलिकडे या शाळेतील मुलांची झालेली शैक्षणिक प्रगती ही कौतुकास्पद अशी असल्याचे गायकवाड म्हणाले.
प्रा. रमेश आढाव म्हणाले की, समाजातील अनेक मंडळी संस्था चालवितात व त्यातून अर्थाजन मिळवितात मात्र हि संस्था हि खर्या अर्थाने एक आगळे वेगळे काम करित असून अपंगाच्या क्षेत्रातील मुलाच्या शैक्षणिक व व्यावसायिक पुनर्वसन करण्याचे या संस्थेचे काम अलौकिक असेच आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संस्थेचे कार्याध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमास उदय निकम, चैतन्य खरात, नितेश शिंदे, शशिकला विटकर, निर्मला चोरमले, अविनाश चोरमले इ.सह विधार्थी व पालक उपस्थित होते.
आभार संस्थेचे अध्यक्ष विनोद हाके यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली शिंदे यांनी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular