Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीमहाबळेश्वरच्या पूर्व भागात रानगव्यांचा वावर वाढला

महाबळेश्वरच्या पूर्व भागात रानगव्यांचा वावर वाढला

भेकवली: महाबळेश्वरच्या पूर्व भागात विशेषतः करून विल्सन पॉईंट परिसरात मोठया प्रमाणात रानगव्यांचा वावर वाढलेला आहे. दिवसेंदिवस या प्राण्यांच्या संख्येत वाढ होत असल्या कारणाने अन्नाच्या शोधात हे रानगवे सभोवतालच्या परिसरात तसेच खाजगी बंगल्याच्या आवारात येत आहेत. सोबत त्यांची लहान पिल्ले असल्याने प्रसंगी हे प्राणी त्यांच्या संरक्षणार्थ आक्रमक होताना दिसत आहेत.
महाबळेश्वरचा जंगल विस्तार मोठा असल्या कारणाने यामध्ये अनेक प्राणी असून या मध्ये रानगवे यांची संख्या मोठी असल्याने सर्रास हे रानगवे आढळून येऊ लागले आहेत. अनेक ठिकाणी हे शेतात घुसून स्ट्रॉबेरी तसेच अन्य पिकांचे नुकसान करत आहेत.हे प्राणी प्रसंगी आक्रमक देखील होताना पहायला मिळत आहेत. त्यामुळे वनविभागाने याची दखल न घेतल्यास दोन वर्षांपूर्वी मालुसर या गावात झालेल्या एका घटनेची पुनरावृत्ती या भागात देखील होऊ शकते या कल्पनेने परिसरात राहणार्‍या स्थानिक नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरी येथील वनविभागाने याबाबत योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी जनतेनं मधून होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular