Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीविडणीत कांद्याची दिवस रात्र जागून राखण करणेची बळीराजावर वेळ

विडणीत कांद्याची दिवस रात्र जागून राखण करणेची बळीराजावर वेळ

फलटण: सध्या कांद्याला सोन्याचा भाव आल्याने विडणी येथे चोरट्यांनी कांद्यावर डल्ला मारला. शेतकर्‍यांच्या कांद्याच्या 18 थैल्या लंपास करुन शेतकर्‍यांचा लाखो रुपयांचा कांदा चोरट्यांनी चोरुन नेला आहे. शेतकर्‍यांना आता शेतात साठवून ठेवलेल्या कांद्याची दिवस रात्र जागून राखण करणेची वेळ आली आहे.
फलटण तालुक्यात विडणी गांव कांद्याचे आगार मानले जाते येथिल शेतकरी वर्ग अल्प भू-धारक असला तरी राञ दिवस शेतात राबून कष्ट करुन शेतातून उत्पन्न काढत असतो विडणी येथून कांद्याच्या हंगामात हजारो क्विंटल कांद्याची शेतकर्याची बाजारात उलाढाल होत असते.
कायम शेतात लाखो रुपये खर्च करुन जुगार खेळणारा शेतकरी हमी भावा अभावी हातात कधी कधी भांडवल पण मिळत नाही तरी पण काळ्या आई वर भरोसा ठेवत खच्चून न जाता इकडून तिकडून पैशाची जमवा जमव करुन नव्या जोमाने नवे पिके घेण्याच्या तयारीला लागत असतो. आर्थिक डबघाईत असणार शेतकरी आता कांद्याच्या पिकाने त्याला बरे दिवस येवू लागले हातात पैसा खळखळू लागला होता.
अल्प भू-धारक शेतकर्यांना पुरेसे भांडवल नसल्याने शेतातच किंवा आपल्या घराजवळ एखाद्या झाडाच्या सावलीला शेतातील काढलेला कांदा थैल्या भरुन ठेवत असतो.त्याला पण वातावरण बदलल की प्लॅस्टिक कागदाने झाकायच कधी उघडून ठेवायचं त्यातनच गरमाईन काही नासला तर परत सगळा खाली ओतून निवडून परत भरायचा.
कांदा लागण केल्यापासून तो काढून गोळा करे पर्यत मजुरा सह शेतकर्‍यांचे लाखो रुपये भांडवल अडकलेले असते.कांद्याला भाव काय मिळेल याची शाश्वती माञ त्याला नसते. आता कांद्याला बरा दर आल्याने चोरट्यांनी शेतकर्याच्या कांद्यावर डोळा ठेवला असून विडणी गावातून रघुनाथ बुवा नाळे पाच थैल्या, सुरेश विठ्ठल नाळे दोन थैल्या अनिल जगन्नाथ अब्दागिरे सहा थैल्या लक्ष्मण जाधव पाच थैल्या अशा एकुण आठरा थैल्यावर चोरट्यांनी डल्ला मारुन लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून या कांदा चोरट्या मुळे विडणी गावात शेतकर्यांना कांद्याच्या ठिकाणी झोपून राखण करावी लागत आहे माञ कांदा चोरट्यांनी राखन करणार्‍या शेतकर्यावर हल्ला केला तर त्याच्या जिवावर बेतू शकते. फलटण ग्रामीण पोलिसांनी गावात गस्त पथक सुरु करावे अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular