Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीमेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? शिंदे कि जवळ ?...

मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? शिंदे कि जवळ ? ; नागरीकांची उत्सुकता वाढली

मेढा / वार्ताहर – मेढा नगरपंचायतीची नगराध्यक्षपदाची माळ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल शिंदे की शिवसेनेच्या उमेदवार निलम जवळ यांच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता वाढली आहे.
अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी कोणीच अर्ज माघारी घेतला नसल्याची माहिती सहा. निवडणुक अधिकारी यांनी दिली. उमेदवारी अर्ज माघारी न घेतलेने राष्ट्रवादी कॉग्रस पक्षाकरीता साधी सोपी वाटणारी लढत आता मात्र काय वळण घेणार याकडे मेढा नगरीतील नागरीकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. नगराध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर लगेच उपाध्यक्ष पदाची निवडणुक होणार असल्याने राजकीय हालचाली वेगाने घडू लागल्या आहेत .
सर्वत्र महाआघाडी कायम असल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष आणि शिवसेना नेते यांच्यात काही तरी सल्ला मसलत होवून पदे वाटून घेण्यात येतील हा अंदाज वर्तविला जात होता परंतु कोणत्याच नेत्याने यात हस्तक्षेप न केल्याने ही निवडणुक राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेना अशी थेट होणार हे अटळ झाले आहे. सध्या नगरपंचायतीवर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची मजबूत पकड असल्याने अपक्षांची मदत घेवून शिवसेना आपला दरारा कायम ठेवणार का याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular