Tuesday, December 2, 2025
Homeठळक घडामोडीसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा

सातारा: कर्नाडस बँकिंग रिसर्च आणि डेव्हलपमेंट फौंडेशन कोल्हापूर यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनिय व गौरवास्पद कामकाजाची दखल घेवून पुरस्कार देवून गौरव केला जातो. तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये होत असलेले विविध बदल व चालू घडामोडींचा आढावा घेवून सहकारी चळवळ बळकट करण्यासाठी ही संस्था उल्लेखनिय कामकाज करते .
या संस्थेमार्फत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांना उत्कृष्ट अध्यक्ष (इशीीं उहरळीारप), बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना उत्कृष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी (इशीीं उएज) व जिल्हा बँकेस उत्कृष्ठ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (इशीीं इरपज्ञ) असे तीन पुरस्कार कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यांत आले .
महाराष्ट्र राज्याच्या सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचे अध्यक्षतेखाली तसेच राज्य बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, माजी सहकार आयुक्त दिनेश ओउळकर, रिझर्व्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक कांबळे, आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. विजय ककडे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये हे पुरस्कार बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, अधीक्षक संदीप शिंदे, महेश शिंदे व अनिल घाडगे यांनी स्विकारला. यावेळी रिझर्व्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक श्री. कांबळे यांनी सातारा जिल्हा बँकेचा, देशामध्ये गौरवशाली परंपरा व बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श बँक म्हणून विशेष उल्लेख केला. तसेच श्री. किरण कर्नाड म्हणाले, सातारा जिल्हा बँक सर्वसामान्य ग्राहकांना बँकिंग सेवा व सुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्यात याकरिता बँक 304 शाखा व 15 विस्तारित कक्षांचे माध्यमातून कृषी सहकारी क्षेत्रात निरंतर कार्य करीत आहे. ग्रामीण विकासाबरोबरच कृषी औद्योगिकरणाचे धोरण बँकेने गतिमान करण्यासाठी विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. बँकेचे अध्यक्ष व सन्माननीय संचालक सदस्य उच्च विद्या विभुषीत व अभ्यासू आहेत संपूर्ण बँकिंग व्यवसाय हा बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट व महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार केला जातो. बँकेचे पीक कर्ज प्रकल्पांतर्गत तसेच बिगरशेती कर्जवाटप हे धोरणास अनुसरून व रिझर्व्ह बँक, नाबार्ड, सहकार विभागाने कळविलेल्या निकषानुसार मंजूर केले जाते. जिल्हयाची वैभवशाली परंपरा कायम टिकविण्याकरीता कुशल मा .संचालक मंडळ व उत्तम प्रशासन, खर्चात काटकसर, काटकसरीतून बचत, बचतीतून समृध्दी व समृध्दीतून स्वावलंबन हा सहकाराचा मुलमंत्र घेऊन बँक प्रगतीची घोडदौड करीत आहे. याची नोंद घेऊनच बँकेचे अध्यक्ष मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांना उत्कृष्ट अध्यक्ष या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. सातारा जिल्हा बँकेने गेल्या सात दशकामध्ये मा. संचालक मंडळाच्या अभ्यासपूर्वक दूरदृष्टीच्या ध्येय धोरणांची यशस्वी अंमलबजावणी केल्याने हे पुरस्कार बँकेस प्राप्त झाले आहेत.
देश पातळीवर सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असलेले डॉ. राजेंद्र सरकाळे यांचे बँकिंग कामकाजाबरोबरच शेती विकासाचे कामकाजही आदर्शवत व प्रेरणादायी आहे.
बँकिंग कामकाजाबरोबरच शेती विषयक 5 पुस्तके प्रकाशित केली आहेत. सातारा आकाशवाणीवरून कृषि तंत्रज्ञानाविषयी सहा महिन्यांचे मालिकाचे प्रसारण केले. दूरदर्शन,मुंबई तसेच सहयाद्री वाहिनी व सुकृत चॅनेल्सचे माध्यमातून जवळपास 50 कार्यक्रमांव्दारे शेतीविषयक कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. ग्रीन हाऊस, जलसंधारणाचे महत्व याकरिता माहितीपटांची निर्मिती केली.
आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ठ कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. जिल्हयातील सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबवित असलेल्या विविध कर्ज योजना, कर्ज वसुलीबाबत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ठ निधी नियोजन, शुन्य टक्के निव्वळ एन .पी .ए, दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमूख सेवा यामुळे आय .एस .ओ .9001-2008 मिळालेले मानांकन, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालेली नोंद, सामाजिक बांधिलकी तसेच राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच खुप कमी वेळात आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक बँकिंगच्या सुविधा देणेसाठी कोअर बँकिंग प्रणालीचा अवलंब केलेला आहे. आजपर्यंत महाराष्ट्र शासन, नाबार्ड, नॅफस्कॉब, राज्य बँक, महारास्ट्र स्टेट को. ऑप बँक्स असोसिएशन तसेच देशातील इतर सहकारी संस्थांकडून विविध 82 पुरस्काराने बँकेस गौरविणेत आले आहे.
या सर्वंकष कामकाजाची नोंद घेऊन बँकेसही उत्कृष्ठ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार देऊन गौरविले आहे.या वेळी महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून आलेले विविध जिल्हा मध्यवर्ती व सहकारी बँकेचे व अर्बन बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व अधिकारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल बँकेचे जेष्ठ संचालक व महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, यांच्यासह सर्व संचालक मंडळ तसेच सर्व व्यवस्थापन प्रतिनिधी, सेवक वर्ग व गटसचिव यांनी अभिनंदन केले. या पुरस्कारामुळे बँकेचे ठेवीदार, हितचिंतक, कर्जदार व सभासद यांनी बँकेच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular