रहिमतपूर : श्री चौंडेश्वरी संगीत महोत्सवात तिसर्या पुष्पात कै.माधवराव शेंडे यांचे शिष्य प्रकाश भंडारे यांच्या सुमधूर बासरीवादनाने झाली.बासरीवादनामध्ये नाट्यगंध ,पद्मगंधा,पहाडी दोल,लोरागावर भजन असे विविध प्रकार सादर करून त्यांनी रसिकजनांना मंत्रमुग्ध केले.त्यांना तबल्यावर किरण जाधव यांनी साथ केली .यानंतर आदित्य जाधव,कार्तिक कांबळे यांची तबलावादन ची जुगलबंदी झाली. चौथ्या पुष्पात उपशास्त्रीय गायिका मंजुषा कुलकर्णी पाटील यांचे बहारदार गायन झाले .विविध रागाचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग आळवून कार्यक्रमाची सुरूवात केली . यावेळी बोलताना मंजूषा कुलकर्णी पाटील म्हणाल्या की,कै.माधवराव शेंडे ट्रस्ट चे इतकं मोठे अप्रतिम काम आहे की आम्ही कलाकार नतमस्तक आहोत संगीत महोत्सवात दुसर्यांदा येण्याची मला संधी दिली.आम्हाला परत विनिताताई आपटेंनी आमंत्रीत केले.सर्व रसिकांचे आशिर्वाद मला मिळावेत. मंजुषा कुलकर्णी पाटील यांनी अलंकापूरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सूपात्र,जयजयराम, कृष्ण हारी, रूप पाहता लोचनी, अगा वैकुंठीचा राया,अगा नारायणा,अगा वासूदेव नंद, अवघे गरजे पंढरपूर, अबीर गुलाल उधळीत रंग रंगख्र व भैरवी सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. मंजुषा कुलकर्णी पाटील यांना साथ त्यांची कन्या रसिका व शिष्य सायली यांनी केली तर हार्मोनियम साठी रोहित मराठे तबल्याची साथ साहेबराव ,पखवाज ओंकार दळवी आणि टाळ वाजवण्यासाठी वय वर्षे 94 असलेल्या माऊली टाकळकर यांनी केली .यांचे स्वागत व सत्कार कै.माधवराव शेंडे ट्रस्ट चे विश्वस्त डॉ.राजेंद्र शेंडे यांनी केले. यावेळी बोलताना कै.माधवराव शेंडे ट्रस्ट चे अरूण माने म्हणाले की,कै.माधवराव शेंडे रहिमतपूर चे वाजपेयी म्हणत होते.गेली चौदा वर्षे रहिमतपूर येथे श्रीचौंडेश्वरी संगीत महोत्सव होतो आहे.ग्रामीण भागातील संगीत रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी देण्याचे काम होते आहे.औंधचा संगित महोत्सव हा रात्रीचा होत असतो त्याच पध्दतीने रहिमतपूर येथे श्रीचौंडेश्वरी संगीत महोत्सवास कै.माधवराव शेंडे (काकांच्या)यांच्या प्रथम स्मृतीपासून प्रारंभ संगिताचा कलेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी पहिल्यांदा कवि गिरीश स्मारकामध्ये सुरू केला,त्यानंतर जंगम मठ,त्यानंतर गांधी मैदानात संगित महोत्सव घ्यायला सुरूवात केली .डॉ. राजेंद्र शेंडे यांचे रहिमतपूर वर खूप प्रेम असल्यानेच ते दरवर्षी कै.माधवराव शेंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री चौंडेश्वरी संगीत महोत्सवाला खर्च करून मोठमोठे कलावंत उपलब्ध करण्यासाठी डॉ.राजेंद्र शेंडे,डॉ विनिता आपटे यांच्या प्रयत्नातून ते दरवर्षी नियोजन करून जे कलावंत या कार्यक्रमास उपलब्ध होतात.डॉ.विनिता आपटे यांच्या प्रयत्नामुळेच हे सर्व शक्य होते त्या पुण्याच्या पण त्यांचे रहिमतपूर चे नाते वेगळेच आहे.
याचा लाभ रहिमतपूर पंचक्रोशीतील शास्त्रीय संगिताचा लाभ लहांनापासून अबालवृध्द,महिला सर्वांना प्रेरणा मिळावी,रसिक श्रोत्यांची दाद मिळावी ,उद्याचे नविन कलाकार निर्माण व्हावेत एवढेच अपेक्षीत आहे याचसाठी आमचा प्रयत्न सातत्याने असतो. स्टेजचे उत्कृष्ट सजावट धैर्यशील मांढरे यांनी केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रहिमतपूर नगरपालिका, सौ.सुमन परशराम फडतरे कन्या प्रशालेचे शिक्षक, शिक्षीका, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.आभार डॉ.विनिता आपटे यांनी मानले.
प्रकाश भंडारे यांच्या बासरीवादनाने रसिक मंत्रमुग्ध
RELATED ARTICLES