कराड : परीट समाजाचे संत गाडगे महाराज यांच्या विचाराने चालू असलेले कार्य व अखंडीत सुरू असलेला वधुवर मेळावा हा इतर समाजासाठी मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन कराडचे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी केले. ते संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथे आयोजित केलेल्या वधुवर मेळाव्यात बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव शिंदे, प्रमुख व्याख्याते प्रा.डी.ए.माने, ज्येष्ठ पत्रकार आनंदराव पवार, पंचायत समिती सदस्या आर्चनाताई गायकवाड, माजी नगरसेविका सुनंदा जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी पाटील म्हणाले, परीट समाजाने प्रत्येक वर्षी वधुवर मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्रीत करण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या परस्थितीला सर्वच समाजाला अशा वधुवर मेळाव्याची गरज आहे.
यावेळी प्रा.डी.ए.माने यांनी संत गाडगे महाराज यांच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी संत गाडगे महाराज संस्थेचे अध्यक्ष भिकु राक्षे, नृसिंह शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य व्ही.जी.थोरात, विशेष लेखा परीक्षक रविंद्र वाघ, कराड शहराध्यक्ष दयानंद वाघ, बाळासाहेब कदम, शिवकुमार जाधव, दिलीप नलवडे, तानाजीराव पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिगंबर यादव सूत्रसंचालन प्रा.आर.एस.रसाळ तर आभार जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव यांनी मानले.
‘परीट समाजाचे कार्य इतर समाजासाठी मार्गदर्शक’
RELATED ARTICLES