Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीयुगंधर पुस्तिकेचे डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते प्रकाशन

युगंधर पुस्तिकेचे डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते प्रकाशन

कराड : कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांचे कार्य आणि विचार आजच्या नव्या पिढीपर्यंत; विशेषत: विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत या उद्देशाने युगंधर पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुलबाबा भोसले व विनायक भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
शिवनगर येथील छत्रपती संभाजी विद्यालयातील उपशिक्षक अशोक सोमदे आणि रेठरे बुद्रुक येथील ताराबाई माधवराव मोहिते विद्यालयाचे निवृत्त प्रभारी मुख्याध्यापक एच.बी. देशमुख यांनी आप्पासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचावेत या हेतुने युगंधर या पुस्तिकेचे लिखाण केले आहे. अतिशय आकर्षक मांडणी असलेल्या या पुस्तिकेत स्व. जयवंतराव भोसले यांचा जीवन परिचय, तसेच त्यांनी सहकार, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात दिलेले योगदान याची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. तसेच आप्पासाहेबांच्या योगदानाबद्दल मान्यवरांनी मांडलेले मौलिक विचार आणि आप्पासाहेबांचा वारसा जपणारे त्यांचे कुटुंबीय याबद्दलची माहितीही या पुस्तिकेतून देण्यात आली आहे. तत्कालीन छायाचित्रांच्या सूचक वापरामुळे ही पुस्तिका वाचकाला त्यावेळच्या काळात घेऊन जाते.
या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्याला कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका उत्तरा भोसले, गौरवी भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.निलिमा मलिक, य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक निवासराव थोरात, माजी सभापती बाळासाहेब लाड, शेतीमित्र अशोकराव थोरात, कृष्णा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे, विक्रमसिंह मोहिते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, दुसर्‍या एका कार्यक्रमात सातार्‍याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधिक्षक अशोक थोरात, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. अरूण रिसबुड, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशीकिरण व फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ.जी. वरदराजुलू यांच्या हस्ते युगंधर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
सार्वजनिक वाचनालयांना युगंधरचे मोफत वितरण
युगंधर पुस्तिकेचे लेखक अशोक सोमदे आणि एच. बी. देशमुख यांनी ही पुस्तिका कराड दक्षिणमधील सार्वजनिक वाचनालयांना मोफत वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रंथालय वितरणासाठी या पुस्तिका कराड नगरपालिकेच्या वाचलनालयात उपलब्ध करण्यात आल्या असून, इच्छुकांनी ग्रंथपाल संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular