Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीराज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत राष्ट-सेवक संघ तळसंदे, शिवाजी उदय सातारा संघ विजेते

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत राष्ट-सेवक संघ तळसंदे, शिवाजी उदय सातारा संघ विजेते

कराडः कृष्णा उद्योग समुहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व.जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या 95 व्या जयंती निमीत्त यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष संघात राष्ट-सेवक संघ तळसंदे व महिला संघात शिवाजी उदय सातारा या संघांनी अजिंक्यपद पटकावले.
कराड तालुका साखर कामगार संघ व श्री. गणेश शिवोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारमहर्षी स्व.जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या 95 व्या जयंतीनिमीत्त कारखाना कार्यस्थळावर राज्यस्तरीय पुरूष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्व.जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) क्रिडानगरी शिवनगर येथे या स्पर्धा पार पडल्या. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते व राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक जगदीश पाटील, भगवान पाटील, विठ्ठल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषीक वितरण करण्यात आले. यावेळी संचालक दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, संजय पाटील, दिलीपराव पाटील, ब्रिजराज मोहिते, पांडूरंग होनमाने, गिरीष पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, म्हाडाचे संचालक पैलवान आनंदराव मोहिते, बहेचे उपसरपंच मनोज पाटील, प्रकाश पाटील, व्हि.के.मोहिते, बाळासाहेब मोहिते, नवाज आंबेकरी, हेमंत धर्मे, प्रकाश धर्मे, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम.के.कापूरकर, श्री.गणेश शिवोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सेक्रेटेरी मुकेश पवार आदींसह कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.
महिला कबड्डी स्पर्धेत व्दितीय क्रमांक जागृती प्रतिष्ठान पुणे, तृतीय क्रमांक जयकिसान वडणगे चतुर्थ क्रमांक शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा या संघानी पटकावले. पुरूष संघामध्ये व्दितीय क्रमांक सिध्देश्‍वर कोपर्डे, तृतीय क्रमांक जय हनुमान बाचणी संघाने तर विश्‍वशांती कामेरी या संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. सोनाली हेळवी शिवाजी उदय सातारा व योगेश चव्हाण तळसंदे हे अष्टपैलू खेळाडू ठरले.
उत्कृष्ट चढाई चे मानकरी शिवरंजनी पाटील शिवाजी वाळवा व सागर कदम कामेरी तर उत्कृष्ट पकडचे मानकरी अंजनी मुळे जागृती पुणे व संकेत पवार सिध्देश्‍वर कोपर्डे हे ठरले. स्पर्धेचे पंचप्रमुख ज्ञानदेव पाटील, प्रा. संजय पाटील , पंच शशिकांत यादव, उमेश साबळे, तानाजी देसाई, निवास पाटील, बापू वगरे, संतोष पाटील, संजय जाधव, काका भिसे, अविनाश ढमाळ, चंद्रकांत पाटील, सिध्दार्थ जाधव, अक्षय देसाई, मुजावर सर, शरद निकम, आदींनी काम पाहीले. रामभाऊ सातपुते यांनी निवेदक म्हणून काम पाहिले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular