Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीकोयनामुळे दूध उत्पादकांच्या जीवनात आर्थिक क्रांती: जगदाळे

कोयनामुळे दूध उत्पादकांच्या जीवनात आर्थिक क्रांती: जगदाळे

कराड : माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या दुरदृष्टीने कोयना दूध संघ प्रगतीपथावर आहे. सहकारी तत्वावर राज्यात सर्वात प्रथम स्थापन झालेल्या कोयना दूध संघाने ग्रामीण भागातील दूध उत्पादकांच्या जीवनात आर्थिक क्रांती करण्याचे काम केले आहे. त्यामुळे संघाच्या कार्यक्षेत्रातील अनेकांचे संसार दुग्ध व्यवसायाच्या माध्यमांतून सुरळीतपणे सुरु आहेत, असे प्रतिपादन कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे यांनी केले.
गोळेश्‍वर (ता. कराड) येथील दूध उत्पादक संस्थेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव जाधव, कोयना दूध संघाचे सहाय्यक व्यवस्थापक डॉ. विजय नष्टे, संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पवार, रवींद्र जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. विजय नष्टे म्हणाले, पारंपरिक पध्दतीने दूध व्यवसाय केल्याने ग्रामीण भागात हा व्ययसाय अडचणीत आला आहे. या व्यवसायात पशुधन व्यवस्थापन महत्त्वाचे असून पशुधन व्यवस्थापनाच्या प्राथमिक पध्दती दूध उत्पादकांनी अवलंबल्यास दुग्ध व्यवसाय किफायतशीर होण्यास मदत होईल.
कोयना दूध संघाचे डॉ. जगदीश जाधव यांनी प्रास्ताविक केले. शिवाजीराव जाधव यांनी स्वागत केले. सचिव बाबासाहेब जाधव यांनी आभार मानले. यावेळी संघाचे संकलन सुपरवाइजर सागर पवार, संस्थेचे संचालक सभासद व दूध उत्पादक उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular