Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीगुणवंतगड ते सुंदरगड रविवारी होणार पदभ्रमंती मोहीम

गुणवंतगड ते सुंदरगड रविवारी होणार पदभ्रमंती मोहीम

पाटण: दुर्ग भ्रमंती दुर्ग अभ्यास यासाठी पाटण तालुक्यातील किल्ले गुणवंतगड ते किल्ले सुंदरगड (दातेगड) अशी पदभ्रमंती रविवार दि. 5 जानेवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या दुर्ग पदभ्रमंतीस छत्रपती शिव अभ्यासक यांचे मार्गदर्शन होणार असून या पदभ्रमंतीस शिवमावळ्यांनी व शिवप्रेमींनी जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहवे असे अहवान सुंदरगड (दातेगड) संवर्धन समिती पाटण यांनी केले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेली अधिक माहिती अशी दिनांक 5 जानेवारी 2020 रविवार रोजी पाटण तालुक्यातील किल्ले गुणवंतगड ते किल्ले सुंदरगड -(दातेगड) या मार्गावर साधारण 12 कि मी अंतर पदभ्रमंती होणार असून सकाळी 8 वाजता श्री भैरवनाथ मंदिर मोरगिरी गावठाण येथे आगमन नोंदणी चहा नाष्टा 8.30 वा. वीर गळ पाहणी – सरनोबत वाडा पहाणे तसेच गुणवंत गडाकडे प्रयाण- पुढे किल्ले मोरगिरी झाकडे – गुंजाळी -येडोबा मंदिर – रामाचा वाडा- काठेवाडी- घेरा दातेगड गाव – सुंदरगड (दातेगड) प्रवेशद्वार- गड पहाणी साधारण असा मार्ग राहणार असून सायंकाळी 4 वा. किल्ले सुंदरगडावर या पदभ्रमंती चा समारोप होईल.
या पदभ्रमंती साठी महत्वाची सुचना – हि पदभ्रमंती पायवाटेने होणार असून पदभ्रमंती साठी लांबून येणार्‍या शिवमावळ्यांनी स्वतंत्र वाहन चालक आणावेत. वाहन चालक मोरगिरी गावठाण येथे पदभ्रमंती साठी शिवमावळ्यांना सोडून वाहने घेऊन पुन्हा पाटण – रामापूर- टोळेवाडी- मराठी शाळा अथवा शक्य झाल्यास सुंदरगडाच्या पायथ्याशी येथील किंवा पाटण चाफोली रोडने कातवडी केर जाईची वाडी मार्गे सुंदरगडाच्या पायथ्याशी येथील काही बदल असतील तर कळवले जातील आपण सर्व दुर्ग प्रेमीं व शिवमावळ्यांनी प्रा. मनोहर यादव सर – 9822035324, डॉ. महेश गायकवाड सर – 99224 14822, बाळकृष्ण ढेंबरे – 92265 66199 यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी. असे अहवान आयोजक–किल्ले सुंदरगड (दातेगड) संवर्धन समिती पाटण यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular