Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीआधार जनसेवेच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आधार जनसेवेच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पाटण: आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त पाटण ग्रामीण रूग्णालयात रक्तदान शिबीर पार पडले त्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन पाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रकांत यादव यांच्या हस्ते झाले. दरम्यान, रक्तदान हे जीवनदान आहे. त्यामुळे रक्तदान करणे एक सामाजिक कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आधार जनसेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते यांनी याप्रसंगी बोलताना केले.
आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्या 13 व्या वर्धापनदिनानिमित्त व स्व. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड आणि ग्रामीण रूग्णालय पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शहाजी शेळके, संस्थेचे संस्थापक सुनील क्षीरसागर, उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, किशोर गुरसाळे, संजय बोंद्रे, रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी दिक्षीत यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, सदस्य उपस्थित होते.
अध्यक्ष अनिल मोहिते पुढे म्हणाले विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आज विज्ञान रक्त बनवू शकलेले नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपघात वा गंभीर आजारामुळे रक्ताची गरज भासते. त्यामुळे आजच्या युगात तरी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.
आपण केलेल्या रक्तदानामुळे एकाचवेळी अनेक जणांचे प्राण वाचतात. म्हणून रक्तदान हे जीवनदान आहे. रक्तदान हे सामाजिक कर्तव्य आहे याची जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे. आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून पाटण तालुक्यात आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या कुटूंबांस मदत, स्वच्छता अभियान, असे अनेक समाजोपयोगी सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे सांगितले.
यावेळी शिबीरातील सहभागी रक्तदात्यांना संस्थेच्यावतीने प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी संस्थेचे सोमनाथ आग्रे, लक्ष्मण पाटील, अनिल घाडगे, विकास डोंगरे, नंदकुमार शेडगे, सुरेश चव्हाण, स्वप्नील नेवरेकर, सुरेश काणे, गणेश बिचकर, दादासाहेब जाधव यांच्यासह वैद्यकीय विभागाचे श्रीमती भाट, दळवी, शेख, साठे, माळवदे यांनी परिश्रम घेतले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular