पाटण: साखरी (ता.पाटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी सातारा जिल्हा खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत विविध तीन गटात यश संपादन करून चमकदार कामगिरी केली. या यशाबद्दल त्यांचे विविधस्तरातून अभिनंदन होत आहे.
स्व. खाशाबा जाधव सातारा जिल्हा कुस्ती स्पर्धेत ओंकार सावंत याने 46 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडल मिळविले. चंद्रकांत सावंत याने 25 किलो वजन गटात तृतीय क्रमांक पटकावला. तर सार्थक गुरव याने 30 किलो वजन गटात तृतीय क्रमांक पटकावला. या दोघांना ब्रांझ मेडल मिळाले. तसेच पाटण तालुकास्तरावर मुलींच्या कुस्ती स्पर्धेत राजश्री सावंत हिने ब्रांझ पदक मिळविले व शाळेने आयोजित केलेल्या गीत मंच स्पर्धेत विशेष कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल त्यांचे विस्तार अधिकारी दीपा बोरकर, केंद्र प्रमुख सुरेश भिसे, मुख्याध्यापक गणेश मगरे, स्वाती धाबे, वंदना रामचंद्र सावंत, अर्चना कुंभार, शिक्षण समिती, ग्रामपंचायत, हनुमान तरुण मंडळ व आझाद हिंद आखाडा तालीम यांनी अभिनंदन केले
सातारा कुस्ती स्पर्धेत साखरी शाळेला तीन मेडल
RELATED ARTICLES