सातारा :- दिवसेंदिवस देशासह राज्यात कोरोनाच्या विषाणू ची व्याप्ती वाढत चालली आहे. या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. या युद्धजन्य स्थितीतही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह जिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील मंजूर पदांपैकी 975 पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे .तसेच रिक्त पदांमुळे अतिरिक्त ताण येत असून याचा प्रादुर्भाव वाढल्यास आरोग्य यंत्रणा तोकडी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून सर्वसामान्य नागरिक विविध आजारांवरील उपचारांसाठी सरकारी रुग्णालयाचा आसरा घेतात .ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयात दररोज सुमारे 200 हून अधिक जण उपचारासाठी येत असतात. एखादा रुग्ण जर गंभीर आजारी असेल तर त्याला पुढील उपचारासाठी ग्रामीण किंवा जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते. सर्वसामान्य नागरिकांनी साठी शासकीय दवाखान्याचे दरवाजे 24 तास खुले असतात .त्यामुळे नागरिकांना वेळेचा अडथळा येत नाही .मात्र सध्या खाजगी दवाखान्यात को रो नाचे भीतीने रुग्णांना दारातूनच माघारी पाठवले जात आहेत. सर्दी, खोकला, साधा ताप यासारख्या आजारांचे रुग्ण सध्या वाढले आहेत. अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयाचा आधार मिळत आहे .जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनाव्हायरस साठी अलर्ट झाली असून सर्व अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. सातारा जिल्ह्यात एक सामान्य रुग्णालय दोन उपजिल्हा रुग्णालय 15 ग्रामीण रुग्णालय सहा प्राथमिक आरोग्य पथके 72 प्राथमिक आरोग्य केंद्र, 400 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, सतरा आयुर्वेदिक दवाखाने असा आरोग्य विभागाचा पसारा आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी विविध संवर्गाची 1758 पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक हजार तीन पदे भरण्यात आली असून 755 पदे रिक्त आहेत.
सातारा जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयासाठी विविध संवर्गाची 971 पदे मंजूर आहेत. पैकी 751 पदे भरण्यात आली आहेत तर 220 पदे रिक्त आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी 30 वर्ग दोनची पंधरा टेक्निशियन 39 लिपिक 13 परिचारिका दहा वर्ग चारची 113 पदे रिक्त असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळाली आहे. संपूर्ण जिल्ह्यातच असणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त कामाने ताण वाढला असताना अनेकांना सध्या 24 तास ड्यूटी करावी लागत असून आठवड्याच्या साप्ताहिक सुट्टीवर ही गदा आली आहे.
कोरोनाच्या लढ्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा अपुरीच ; मंजूर पदांपैकी 975 पदे रिक्त …
RELATED ARTICLES