मेढा ( वार्ताहर ) – कोरोना परिस्थितीतही अविरत कार्य करणारे कर्मचारी यांना सकाळी ८ वाजले पासून पेट्रोल मिळावे अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
कोरोना प्रादुर्भावाचा जोर बघता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अत्यावश्यक सेवेचा अवधी सकाळी ९ते दुपारी २ केला असून याची अंमलबजावणी २२ एप्रिल २०२०पासून काटेकोरपणे बजावली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गास कार्यालयीन वेळेत पोहोचणे कामी सकाळी एक तास आधीच निघावे लागत असून पेट्रोल पंपावर मात्र ९ते २ या वेळेत पेट्रोल मिळणार असल्याने सर्वांची त्रेधातिरपीट होणार असल्याचे चित्र पहावयास मिळणार आहे.
पेट्रोल पंपावर सकाळी ९ नंतरच पेट्रोल मिळणार असल्याने कर्मचारी आणि पेट्रोल पंप मालक यांच्यात तु- तु -मै- मै होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अत्यावश्यक सेवेत कार्य करणारे विविध क्षेत्रातील कर्मचारी असून यांचे आयडेंटी कार्ड पाहून त्यांना पेट्रोल मिळावे अशी चर्चा जोर धरू लागली आहे. याबाबत योग्य तो निर्णय मिळावा अशी अपेक्षा ही कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.
अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांना सकाळी लवकर पेट्रोल मिळावेबाबतची चर्चा सुरु
RELATED ARTICLES