Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीऔंध पोलीसांकडून धडक कारवाई करत 160 वाहने जप्त ; विनामास्क फिरणाऱ्यांवर ही...

औंध पोलीसांकडून धडक कारवाई करत 160 वाहने जप्त ; विनामास्क फिरणाऱ्यांवर ही कारवाई ; तेवीस हजार दंड वसुली; यापुढील काळात कारवाई अधिक कडक करणार :- सपोनि उत्तम भापकर

औंध(वार्ताहर):- कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी औंध पोलिसांनी औंध व पुसेसावळी परिसरात कारवाईचा धडाका लावला असून या कारवाईत सुमारे 160गाडया जप्त करून चारचाकी ,दुचाकी वाहनचालक तसेच विना मास्क प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडून सुमारे तेवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती औंधचे सपोनि उत्तम भापकर यांनी दिली दरम्यान बेकायदेशीरपणे प्रवास करणार्या वाहनचालकांवर यापुढील काळात आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा भापकर यांनी दिला असून यासाठी विविध ठिकाणी चेकपोस्ट तयार करून पोलीस पथके ही तैनात करण्यात आली आहेत.

मागील एक महिन्यापासून लाँकडाऊन सुरू आहे .त्यामुळे औंध व पुसेसावळी परिसरात कोरोनाची लढाई लढण्यासाठी औंंध पोलीस विभागाने ही कंबर कसली आहे. सपोनि उत्तम भापकर यांनी औंध पोलीस स्टेशन व पुसेसावळी पोलीस दुरक्षेत्रात येणाऱ्या 41गावे,वाडयावस्त्यांवर लाँकडाऊनची अंमलबजावणी कडकपणे व्हावी यासाठी कडक उपाययोजना केल्या यामध्ये औंध व पुसेसावळी परिसरात पोलीस पथके तैनात करत जीवनावश्यक व अत्यावश्यक साहित्य वगळता बिनाकामाची फिरणारी दुचाकी, चारचाकी वाहनचालकांवर धडक दंडात्मक व वाहन जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये सुमारे 150दुचाकी वाहने व दहा चारचाकी वाहने जप्त केली आहेत.

त्याचबरोबर बिनामास्क फिरणाऱ्या सुमारे चाळीस जणांवर मोठी दंडात्मक कारवाई केली आहे. यामाध्यमातून सुमारे आठ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे तर बेकायदेशीरपणे वाहन
चालविणाऱ्यावाहनचालकांकडून सुमारे पंधरा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

याकामी सपोनि उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर येवले, स्नेहल सोमदे,पोलीस नाईक प्रशांत पाटील, बी.एन.जाधव,कुंडलिक कटरे, वळकुंदे,एन.बी.काळेल
शिंदे,जाधव
आदी पोलीस कर्मचारी परिश्रम घेत आहेत. दरम्यान औंध ,पुसेसावळी परिसरात ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे अशी माहिती देऊन उत्तम भापकर म्हणाले विनाकारण कोणीही वाहने घेऊन घराबाहेर पडू नये, गरजूंनी मास्क वापरावेत,उघडयावर थुंकू नये अशा बेफिकीरपणे वागणार्या व्यक्तिंवर ही यापुढे कारवाई केली जाणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular