Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसातार्‍यातील पत्रकारांची आ. शिवेद्रराजेंनी घेतली काळजी ; लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा बजावत...

सातार्‍यातील पत्रकारांची आ. शिवेद्रराजेंनी घेतली काळजी ; लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा बजावत असलेल्या पत्रकारांना मदत

सातारा :  लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा बजावत असलेल्या पत्रकारांना मदत करण्याचे आवाहन सातारा जिल्हा पत्रकार संघाने केल्यानंतर सर्वात प्रथम आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी हाकेला ओ देवून सातार्‍यातील पत्राकारांची काळजी घेतली. प्रत्येक वृत्तपत्राच्या कार्यालयात काम करत असलेल्या पत्रकारांना पत्रकार संघामार्फत जीवनावश्यक वस्तूंचे किट पाठवत आ. शिवेंद्रराजेंनी इतरांसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे.
लॉकडाऊन असल्यामुळे पत्रकारांच्या कुटुंबांमध्येही समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्वच पत्रकार सुखवस्तू नाहीत. गरजू व गरीब पत्रकारांना मदत पोहचली पाहिजे यासाठी सातारा जिल्हा पत्रकार संघाने समाजातील दानशूरांना आवाहन केले होते. ज्यांना मदतीची आवश्यकता आहे त्यांनी नावे पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी तातडीने प्रतिसाद दिला. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्याशी चर्चा करुन सातार्‍यातील सर्वच वृत्तपत्रांच्या कार्यालयातील पत्रकारांना त्यांनी तातडीने जीवनाश्यक वस्तुंचे किट पाठवून दिले. सातारा शहरातील पत्रकारांची अडचणीच्या काळात आ. शिवेंद्रराजेंनी काळजी घेतल्याबद्दल सर्वच पत्रकारांनी त्यांना धन्यवाद दिले. यावेळी सातार्‍यातील ज्येष्ठ तसेच दिवंगत पत्रकारांच्या कुटूंबापर्यंतही मदत पोहचवण्यात आली.
हरीष पाटणे म्हणाले, सातारा जिल्हा पत्रकार संघामार्फत जे खरोखरच गरजू आहेत व ज्यांनी संघाकडे संपर्क केला आहे, अशा पत्रकारांपर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मदत पोहचवण्याचे काम आम्ही सुरु केले आहे. आ. शिवेंद्रराजे यांनी मात्र सर्वच लोकप्रतिनिधींसमोर आदर्श ठेवला आहे. आमचीही इच्छा आहे जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांना या काळात मदत झाली पाहिजे, मात्र सातारा जिल्हा पत्रकार संघाकडे तशा पध्दतीची आर्थिक तरतूद नाही. आ. शिवेंद्रराजेंचा आदर्श त्या त्या मतदार संघातील लोकप्रतिनिधींनी घेवून सर्वच पत्रकारांना या अडचणीच्या काळात सहकार्य केले तर सर्वच पत्रकारांपर्यंत मदत पोहचेल.
विनोद कुलकर्णी म्हणाले, सातार्‍यातील पत्रकारांचे व आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यांनी केवळ गरजूंनाच नव्हे तर सरसकट मदत करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. शिवेंद्रराजे सातत्याने पत्रकारांच्या प्रश्नांची दखल घेत असतात. जिल्ह्यातील इतर आमदार व लोकप्रतिनिधींनी अत्यावश्यक सेवा बजावत असलेल्या पत्रकारांची काळजी घ्यावी, असेही कुलकर्णी म्हणाले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular