Saturday, June 21, 2025
Homeसातारा जिल्हापाटणमुळगाव पुलावरून कोयना नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या

मुळगाव पुलावरून कोयना नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या

पाटण :- पाटण शहरानजीक असलेल्या मुळगाव पुलावरून कवरवाडी येथील सौ. सुनंदा पांडुरंग कवर (वय ५०) यांनी आजारपणाला कंटाळून गुरूवारी सायंकाळी कोयना नदीच्या पाण्यात उडी टाकून आत्महत्या केली. दरम्यान, त्या पुलाच्या नजीक लौकडाऊन बंदोबस्तासाठी असलेल्या होमगार्ड व स्थानिक तरूणाने त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने त्या महिलेला वाचविण्यात अपयश आले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी. सौ. सुनंदा कवर यांचा मुलगा संतोष पांडुरंग कवर यांनी याबाबतची फिर्याद पाटण पोलिसात दाखल केली आहे. यात म्हटले आहे, की सुनंदा पवार या आजारी होत्या. त्या आजाराला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केली. पाटण शहरानजीक मुळगाव – कवरवाडी हे गाव आहे. या मुळगाव कोयना नदीवरील पुलावरील वाहतूक सध्या कोरोना पार्श्‍वभूमीवर बंद ठेवण्यात आली आहे. तथापि, सौ. सुनंदा पवार या गुरुवारी तेथे अचानकपणे आल्या व त्यांनी कोयना नदीपात्रात उडी घेतली. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. दरम्यान त्याठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले होमगार्ड विजय जाधव व स्थानिक तरूणाने पाण्यात उडी सौ. सुनंदा कवर यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने त्यांना अपयश आले. या घटनेची नोंद पाटण पोलिसात झाली असून पुढील तपास हवालदार शेवाळे करत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular