Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीलॉक डाऊन कालावधीत मेढ्यात दूध आणि औषधे घरपोहोच मिळणार

लॉक डाऊन कालावधीत मेढ्यात दूध आणि औषधे घरपोहोच मिळणार

मेढा ( वार्ताहर ) मा. जिल्हाधिकारी सो यांचे आदेशान्वये मेढा शहर लॉक डाऊन केले गेल्याने या कालावधीत दुध आणि औषध सेवा घरपोहोच मिळणार असल्याची माहिती मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. अमोल पवार यांनी दिली.
मेढा शहर लॉक डाऊन जाहीर झाल्याने नागरीकांच्या हिताला प्राधान्य दिल्याने ग्रामस्थांतुन समाधान व्यक्त करायात येत आहे. या कालावधीत सकाळी ९ ते २ या वेळेत दुध विक्रेते आणि मेडिकल विक्रेते आपली दिलेली सेवा बजावणार आहेत. मेढा येथिल १३ दुध विक्रेते आणी १४ मेडिकल स्टोअर्स यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
मेढा शहरलॉक डाऊन रहावे याकरीता नगरपंचायत अधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका यांनी निवेदन दिल्यानंतर मेढा शहरची सत्य परिस्थीती जावलीतील प्रशासकीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी सो यांना दिल्याने तातडीने मेढा शहर लॉक डाऊन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या या बद्दल ग्रामस्थांनी ही प्रशासनाचे आभार मानले आहेत. या लॉक डाऊन परिस्थीतीत या महत्वाच्या सेवा सुरू राहणार असल्याने ग्रामस्थांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. आत्ता कोठे मेढा नगरी शांत रूपाने कार्यरत राहील असा विश्वास ही जनतेतुन व्यक्त होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular