Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीफलटण तालुक्यात अजून एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.... ; जिल्ह्यात कोरोना बाधितांची...

फलटण तालुक्यात अजून एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण…. ; जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झाली ३६

फलटण -फलटण तालुक्यात अजून एकाला कोरोना ची लागण झालेचे चित्र स्पष्ट झाले आहे.सदरचा कोरोना पॉझिटिव्ह मुलगा हा शनिवार दिनांक २५ एप्रिल रोजी पुण्यावरुन तो फलटण मधील त्याच्या गावी येत होता.२८ वर्षीय मुलगा ताप व खोकला येत असल्याने तो घरी न जाता उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता.
सदर व्यक्तीची तपासणी करण्यासाठी रविवार दिनांक २६ एप्रिल रोजी त्याचा स्वॅब घेऊन BJMC ला तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.त्यानंतर सोमवार दिनांक २७ एप्रिल रोजीच्या अहवालामध्ये सदर व्यक्तीची चाचणी कोविड१९ साठी पाॅझिटिव्ह आली आहे.व सदरचा व्यक्ती हा तब्बल १७ जनांच्या संपर्कात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीने शोधण्यात आले असून त्यांची संख्या १७ आहे. सदर कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला पुढील उपचारासाठी सिव्हील हाॅस्पीटल, सातारा येथे पाठविण्यात आले आहे.
सदर व्यक्तीहा फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालय वगळता इतर कोणत्याही नागरिकांच्या संपर्क न आल्याचे दिसून येत नसल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये.
मात्र कोविड-१९ विषयी पूर्वी दिलेल्या मास्क, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार साबणाने हात धुणे इ. सारख्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असून बाहेरगावावरुन आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती तात्काळ प्रशासनास देणे आवश्यक आहे.
याशिवाय स्थानिक व बाहेरगावावरुन आलेल्या आणि खोकला, ताप इ. लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.असे आव्हान उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular