सातारा :- सातारा – कास रस्त्यावर यवतेश्वर घाटात तीव्र उतारावरून जाणारा मालवाहू डंपर आज दुपारी साडेबाराच्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने घाटातून खोल दरीत कोसळला.
सध्या सातारा कास रस्त्यावर रस्ता रुंदीकरणाचे व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरील कामाचे ठेकेदार यांचा मालवाहू डंपर कास कडून साताराकडे घाटातून तीव्र वेगाने जात होता. या डंपर चालकाचा ताबा सुटल्याने हा डंपर घाटाचे कठडे तोडून थेट दरीत कोसळला .आणि पलट्या खात दरी मध्ये जाऊन पडला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अचानक घाटातून खाली कोलांट्या घेतलेला डंपर पाहून या परिसरात काम करणाऱ्या शेतातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली घटनेची माहिती कळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत .
यवतेश्वर घाटातून मालवाहू डंपर दरीत कोसळला.
RELATED ARTICLES