पाटण :- बुधवारी क्रुष्णा हौस्पीटल कराड येथून सर्वात कमी वयाचा पेशंट म्हणजेच डेरवण (ता. पाटण) येथील अवघे १० महिन्याचे बाळ आणि सर्वात वयोवृध्द पेशंट म्हणजेच म्हारुगडेवाडी (ता. कराड) येथील ७८ वर्षीय महिलेसह ओगलेवाडी (ता. कराड) येथील २८ वर्षीय युवक कोरोनामुक्त झाल्याची बातमी येताच डेरवण ता. पाटण येथील १० महिन्याच्या बाळा बरोबर अवघा पाटण तालुका कोरोना मुक्त झाल्याचा आनंद डेरवण बरोबर संपूर्ण पाटण तालुक्याला झाला. हे बाळ आपल्या गावी पोहचताच गावकऱ्यांनी त्याचे टाळ्यांच्या गजरात फुलांची उधळण करत आनंदात स्वागत केले.
कृष्णा हॉस्पिटलच्या टीमने केलेल्या योग्य व यशस्वी उपचाराने आज तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले. तिन्ही कोरोनामुक्त रुग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकीकडे कराड कोरोनाबाधित म्हणून हॉटस्पॉट होत असताना एका दिवसात तीन रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याचा आनंद क्रुष्णा हौस्पीटल मधील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर होता. कोरोनामुक्ती मध्येही कराड पुढे जाऊ लागले आहे. हा सकारात्मक व समाधान कारक बदल असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले.
बधितांमध्ये जिल्ह्याचा आकडा ४३ तर कराड ३० वर पोहीचले असताना बुधवारी कृष्णातून ३ जण कोरोनामुक्त होऊन घरी सोडण्यात आले आहे. १५ एप्रिलला एकाच दिवशी जिल्ह्यात ४ जण बाधित सापडले होते. त्यातील डेरवणच्या बाळासह आजी आणि युवकाचा समावेश होता.
दहा महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केली आहे. पाटण तालुका कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागातल्या पाटण तालुक्यात एक दहा महिन्याचे बाळ बाधित असल्याचे लक्षात आले होते. अवघ्या १० महिन्याच्या बाळाने कोरोना विरोधातला लढा जिंकला आहे. त्याचे १४ व १५ दिवसांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने बाळाला घरी सोडण्यात आले आहे. यावेळी बाळ आपल्या आई सोबत डेरवण ता. पाटण येथे आपल्या गावी पोहचताच गावकऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात फुलांची उधळण करत बाळाचे आनंदात स्वागत केले. यावेळी बाळ सोखरुप व कोरोना मुक्त होऊन घरी परतल्याचा आनंद परतेकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. गावकऱ्यांनी क्रुष्णा हौस्पीटल कराड येथील सर्व डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांचे यावेळी आभार मानले.