Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीकराड येथील 12 व सातारा  येथील कारागृहातील 5 असे एकूण 17 जणांचा...

कराड येथील 12 व सातारा  येथील कारागृहातील 5 असे एकूण 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ; 149 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 183 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

सातारा दि. 7 ( जि. मा. का ):  कराड येथील 12 निगट सहवासित व सातारा येथील जिल्हा कारागृहातील 5 कैदी अशा एकूण 17 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह (कोविड-19) बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

149 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 23, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 19, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 44, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 43, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 15 व ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 5 असे एकूण 149 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक                  डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

183 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 10, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 106, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 49, ग्रामीण रुग्णालय वाई येथे 10, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 8 असे एकूण 183 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 112 इतकी आहे. या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 96, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 14, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular