Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडी 99 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 13 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

 99 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 13 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

सातारा दि. 11 (जिमाका) : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 3 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 96 असे एकूण 99 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.

13 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

10 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 13 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular