महाबळेश्वर : प्रशासनाने जिल्ह्यातील मद्य विक्रीचे दुकाने काही नियम व अटींसह सुरू करण्यास परवानगी देताच आज दि. १३ मे रोजी महाबळेश्वर येथील मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली. मद्य विक्रीची दुकाने सुरू झालेली कळताच महाबळेश्वर येथील तसेच आजूबाजूच्या परिसरातील तळीरामांनी एकच गर्दी केल्याने दुकाना बाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
राज्यातला लॉकडाऊन चौथ्या टप्प्यात असून जीवनावश्यक वस्तू वगळता मद्य विक्रीला बंदी होती. त्यामुळे मद्य प्रेमींची चांगलीच गैरसोय झाली होती .अनेक मार्गानी मद्य मिळवण्यासाठी धडपड करत असलेले आज मात्र सकाळ पासूनच अगदी संयमात उन्हामध्ये रांगेत उभे राहत आपला नंबर येण्याची वाट पाहत होते. या घाई गडबडीत देखील तळीरामांनी सोशेेल डिस्टन्सचे नियम काटेकरपणे पाळलेले पाहायला मिळाले. पोलिस प्रशासनाने तसेच दुकान मालकांनी देखील परिस्थिती योग्य प्रकारे हाताळलेली दिसून येत होती. प्रश्न असा आहे की पुढील किती दिवस तळीरामांची अशी गर्दि या ठिकाणी पाहायला मिळणार किंवा किती दिवस दुकांनांबहेर लांबच लांब रांगा लागणार हे पाहणे ऊच्छुकतेचे ठरणार आहे.
या सर्व घडामोडींत प्रशासनाचे देखील दुसऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होता कामा नये हे तितकेच खरे आहे. परंतु एक मात्र नक्की की मागील २ महिन्यांपासून मद्यपिंचे जे हाल चालु होते ते पहाता तळीरामांचा जिव आज अखेरीस कुठे तरी सुखावला आहे असेच म्हणावे लागेल .
महाबळेश्वर येथे मद्य विक्री सुरू ; मद्य विक्री दुकानावर तळीरामांची मोठ्या प्रमाणात गर्दी.
RELATED ARTICLES