परळी :- मे महिना सुरू झाल्यापासून सातारा पारा 40 ते 42 अंश सेल्सिअस कडे झुकता आहे एकीकडे कोरण्याचे संकट आणि दुसरीकडे घरा तो काढा अशा वातावरणात दोन वेळा हुलकावणी दिलेल्या अवकाळी पावसाने सातारा यासह परळी खोऱ्यात आधार बरसात करत दोन ते तीन तास चांगलेच झोडपून काढले धुवाधार पाऊस अन नालेसफाई न झाल्याने डोंगरावरील मातीचे लोट हे रस्त्यावर आल्याने ठिकाणी वाहनधारकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.
परळी ते केळवली या मार्गाची दुरुस्ती गेली कित्येक वर्षे झालेले नसताना त्याचबरोबर रस्त्या नजीकच्या नाल्याची खुदाई न केल्याने गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने डोंगरावरील मातीचे लोट रस्त्यावर आले यामुळे वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडत आहे तरी संबंधित प्रशासनाने रस्तेदुरुस्ती राहुद्या नाली खुदाई तरी करा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहे.
मातीचे लोट देताहेत अपघातांना आमंत्रण
परळी ते केळवली या मार्गावरील नालेसफाई न झाल्याने गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने डोंगरावरील मातीचे लोट हे रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज घेता येत नाही. यामुळे छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

