Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडी6 जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह ; 14 जण निगेटिव्ह तर 139...

6 जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह ; 14 जण निगेटिव्ह तर 139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा दि. 23 (जिमाका) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 6 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्ये म्हासोली ता. कराड येथील 1 मुलगी (वय 15), 1 पुरुष (वय 71 ), ढेबेवाडी फाटा ता. कराड येथील 1 मुलगी (वय 18) 1 युवक (वय 23) 1 महिला (वय 44), गलमेवाडी कुंभारगाव ता. पाटण येथील 1 युवती (वय 24) असे एकूण 6 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 14 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

*139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला पाठविले*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथील 20, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 44, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 11, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 54, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 2 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 8 असे एकूण 139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 247 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 127 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 114 आहे तर मृत्यु झालेले 6 रुग्ण आहेत.
0000

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular