Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीकन्टेमेंट झोन मधे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा :- पोलीस अधीक्षक...

कन्टेमेंट झोन मधे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा :- पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते.

पाटण :- पाटण तालुक्यात कोरोना बाधितांची वाढ झपाट्याने वाढत आसताना हि कोरोना साखळी खंडित करण्याचा यशस्वी प्रयत्न प्रशासन वेगाने करत आहे. अशा परस्थितीत पोलिस प्रशासन देखील सतर्क आहे. पाटण तालुक्यात ज्या ज्या गावात बाधित रुग्ण सापडतील ती गावे कन्टेमेंट झोन मधे आणली असून अशा गावांत कोणी संचारबंदीचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर तात्काळ कारवाईचे करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.

पाटण तालुक्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आसताना सातारा जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी तातडीने आज पाटणला भेट देऊन कोरोना बाधित गावांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बाधित गावे कन्टेमेंट झोन मध्ये असून कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या निकटसहवाशीतांना तात्काळ कॉरंटाइन करुन विलगीकरण कक्षात हलविण्याच्या सुचना दिल्या. जेणेकरून जितल्या तिथे कोरोना साखळी खंडित करता येईल. अशा गावात स्थानिक गाव समिती बरोबर पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. कंटेनमेण झोन मधे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगून कोरोना बाधितांची संख्या वाढत आसताना नागरिकांनी देखील सतर्क राहून स्वतः ची काळजी स्वतः घेतली पाहिजे तसेच प्रशासनाला देखील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्विनी सातपुते मैडम यांनी केले आसल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी पाटण पोलिस स्टेशनच्या पो.नि. तु्प्ती सोनावणे यांची उपस्थिती होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular