Friday, June 20, 2025
Homeसातारा जिल्हापाटणपाटण तालुक्यात कोरोनाचा भुकंप ; कालच्या एका दिवसात १९ पॉझिटिव्ह ; शनिवार...

पाटण तालुक्यात कोरोनाचा भुकंप ; कालच्या एका दिवसात १९ पॉझिटिव्ह ; शनिवार ठरला कोरोना वार ; ६२ जणांचा अहवाल प्रतिक्षेत ; पाटण तालुक्यातील एकुण बाधित संख्या – २५ ; दिवसभरात सातारा जिल्ह्यात सापडले ७७ बाधित रुग्ण ; जिल्ह्यातील एकुण बाधितांची एकुण संख्या २७८

पाटण :- शुक्रवारी रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातील ४० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आसताना शनिवारी सायंकाळी आणखी ६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आसता पुन्हा रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान ३१ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर दिवसभरात एकुण जिल्ह्यातील ७७ रुग्णांपैकी ऐकठ्या पाटण तालुक्यातील १९ कोरोना बाधित रुग्णांचा समावेश झाला आहे. शनिवार कोरोना वार ठरला असून या अहवालाने पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून कोरोना भुकंप झाल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. तर पाटण तालुक्यातील रुग्णांची एकुण संख्या २५ झाली आहे. सातारा जिल्ह्यातील – २७८

यामध्ये पाटण तालुक्यात तळमावले – ढेबेवाडी विभाग एकूण -१३, शिरळ – ४, गावडेवाडी – २ असा रुग्णांचा समावेश आहे. यातील १५ रुग्ण पाटण येथील कोरोना विलगीकरण कक्षात दाखल होते. तर २ रुग्ण गावडेवाडी प्राथमिक शाळेत कोरोंनटाईंन झाले होते. यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच त्यांना शनिवारी सकाळी १२ वा. सुमारास तातडीने पुढील उपचारासाठी क्रुष्णा हौस्पीटल कराड येथे नेण्यात आले आहे. तर गावडेवाडी येथील निकटसहवाशीत ९, आणि वाटोळे येथील १ अशा १० जणांना पाटण येथे कोरोणटांईन केले आहे अशी माहिती प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.आर. पाटील, डॉ. चंद्रकांत यादव यांनी दिली. तर बनपुरी, शिरळ, गावडेवाडी, भालेकरवाडी, गलमेवाडी, धामणी, बाचोली या गावात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाटण येथील विलगीकरण कक्षात ६७ कोरोना बाधित निकट सहवाशीत कोरोणटांईन करून ठेवण्यात आले होते. त्यापैकी पंधरा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून अद्याप ५२ जणांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. आज नव्याने गावडेवाडी येथील ९ जण आणि वाटोळे येथील १ जण पाटण येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. या कोरोना केयर सेंटर मधे निकट सहवाशीत व्यक्तींची संख्या वाढत असून सैनिक वस्तीग्रुह, बाळासाहेब देसाई कौलेज वस्तीग्रुह येथे वाढीव प्रयायी व्यवस्था करण्यात आली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular