पाटण :- पाटण तालुक्यातील गोरगरीब निराधार महिलांचा आधारस्तंभ तसेच राजकिय, सामाजिक सर्व क्षेत्रामद्ये अग्रगण्य काम करणाऱ्या स्व. आयेशा सय्यद भाभी यांच्या स्मरणार्थ कोरोना योध्दा म्हणून महत्वाची कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशाताई यांना पीपीई सुरक्षा किटचे रफीक सय्यद यांनी वाटप केले.
आयेशा सय्यद भाभी यांचे गेल्या काही महिन्यापूर्वी अकस्मित निधन झाले. अन्यायग्रस्त महिलांच्या हाकेला त्या सदैव तप्तर असत. आज कोरोना ने संपूर्ण देशात व राज्यात थैमान घातले आहे. आपली आई जर आज असती तर ती गोरगरिब जनतेसाठी धावून गेली असती आज ती नाही म्हणून तिच्या स्मरणार्थ ती ज्या महिलांच्या सानिध्यात सदैव कार्यरत होती त्यांनाचं काही तरी मदत करावी या हेतूने त्यांचे चिरंजीव रफिक सय्यद व समिर सय्यद यांनी पीपीई सुरक्षा किटचे वाटप केले.
अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई या कोरोना योध्दा म्हणून सतत लोकांच्या सेवेत आहेत. प्रसंगी आपला जीव धोक्यामद्ये घालून घर ते घर त्या माहिती संकलन करत आहेत. त्यांना खरतरं या सुरक्षा किटची गरज आहे. हे ओळखून सय्यद कुटुंबियांनी पाटण बीटातील महिलांना या सुरक्षा किटचे वितरण केले.
या प्रसंगी भाभींच्या आठवणींनी सर्वांना गहिवरुण आले. माजी सरपंच चंद्रकांत मोरे, पत्रकार शंकर मोहिते, विद्या म्हासुर्णेकर – नारकर यांनी भाभीच्यां बद्दल आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हणले की, काही माणसं ही चंदनासारखी असतात ती आपल्या मद्ये नसली तरी त्यांचा सुगंध नेहमी दरवळत राहतो. या वेळी इक्बाल सय्यद, रफिक सय्यद, समीर सय्यद, हसिना सय्यद, गोरख नारकर, पत्रकार विक्रांत कांबळे, नितीन खैरमोडे, सुनील दरडे, राजेंद्र देसाई आदीसह पाटण बीटातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई या मोठ्या संख्येने उपस्थित होते.