Friday, June 20, 2025
Homeसातारा जिल्हापाटणबालकाने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च कोरोना काळात मुख्यमंत्री साहाय्यता निधीस दिला.

बालकाने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च कोरोना काळात मुख्यमंत्री साहाय्यता निधीस दिला.

 

पाटण:- पाटण येथे पुरवठा शाखेमध्ये पुरवठा लेखापाल म्हणून कार्यरत असणाऱ्या महादेव अष्टेकर यांच्या चिरंजीव मनीष ने त्याच्या नऊ व्या वाढदिवसाचे अवचित्य साधून वाढदिवसाला होणारा खर्च टाळून तो कोरोनाच्या काळात उपयोगी पडावा या उध्दात हेतूने प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव यांच्याकडे जमा सोपवून मुख्य मंत्री  सहाय्यता निधी खात्यात जमा केला.
सध्या राज्यामध्ये व देशामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. राज्य सरकार कोरोना पाश्वभूमीवरती लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहे. परंतू सरकारला ही आपली थोडी बहूत मदत व्हावी या हेतूने या बालकाने आपला वाढदिवस या वर्षी न करता ते पैसे मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देऊ असे वडिलांना सांगितले. सदैव गोरगरिब जनतेसाठी कार्यरत असणारे पुरवठा विभागातील अष्टेकर यांनी आपल्या मुलाची ही उदात्तं भावना लगेचंचं पूर्ण केली.
सदर रकमेचा चेक पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव यांचेकडे सादर केला. या लहान बालकाचे हे उदात्तं विचार आणि त्याचा बालहट्ट पुरवणारे त्याचे वडिल यांचे  सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular