Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीसातारा नगरपालिका इमारतीत उपमुख्याधिकारी यांनाच लाच घेताना अटक

सातारा नगरपालिका इमारतीत उपमुख्याधिकारी यांनाच लाच घेताना अटक

 

सातारा दि : सातारा नगरपालिका ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे.छत्रपतींची राजधानी म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या या सातारा नगर पालिकेत तब्बल २ लाख ३० हजारांची लाच घेताना उप मुख्यधिकारी संचित धुमाळ यांनाच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

आज दुपारी गोपनीयता पाळून सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक उपआयुक्त सुहास शिर्के व त्यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईने सातारा नगर पालिकेची आणखी एक वेगळी बाजू चव्हाट्यावर आली आहे.  शंभर वर्षांची परंपरा असलेल्या सातारा नगर पालिकेच्या कारकिर्दीत अनेक प्रामाणिक नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी तसेच अधिकारी म्हणून अनेकांनी काम केले होते. पण, एवढया मोठ्या प्रमाणात लाच घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने ‘तो मी नव्हेच” असा पवित्रा अनेकांनी घेतला आहे.

सातारा नगरपालिका म्हणजे एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी निधी वाटप करणे, कधी मोजक्या लोकांना रोख रक्कम व पुरस्कार देणे तर दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या नावाचा जाहीर करण्यात आलेला पुरस्कार थांबविणे. अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या या नगर पालिका प्रशासनाने   साताऱ्यातील साध्या रस्त्याची नोंद ठेवली नाही. असे असताना नवीन बांधकाम परवाने देवून अनेकांचे उकळ पांढरे केले आहे.  त्यातूनच हे लाच प्रकरण घडले असून उप मुख्यधिकारी धुमाळ हे लाच घेताना सापडले आहेत. त्याच्या लाचेतून जे लाभार्थी आहेत. त्यांच्या पर्यंत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सातारा नगर पालिके विरोधात यापूर्वी अनेक तक्रारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आल्या होत्या पण, ठोस उपाययोजना होत नसल्याने अखेर लाच प्रकरण घडल्याची चर्चा होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular