Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीखाजगी हॉस्पिटल मध्ये 71 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यु ; तर 115...

खाजगी हॉस्पिटल मध्ये 71 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यु ; तर 115 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह ; जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 727 असून 499 जण कोरोना मुक्त झाले आहेत ; 194 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत तर आज पर्यंत एकूण 32 जणांचा मृत्यु झालेला आहे.

 

सातारा दि. 14 ( जि. मा. का ) : काल रात्री सातारा येथील खाजगी रुग्णालयात निमोनिया वर उपचार सुरु असलेल्या सातारा तालुक्यातील राजापुरी येथील 71 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला असून उपचारा दरम्यान त्याचा स्त्राव तपासणी करीता खाजगी प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेला होता त्यात तो कोरोना बाधित असल्याचे संबंधित रुग्णालयाने कळविले आहे. हा रुग्ण मागच्या महिन्यात मुंबई वरून आला होता. अशी माहितीही संबंधित रुग्णालयाने दिली असल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
115 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
रात्री उशिरा एन.सी.सी.एस. पुणे यांनी 89 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड यांनी 26 असे एकूण 115 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर कळविली आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 727 झाली असून कोरोनातून 499 बऱ्या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 194 इतकी झाली आहे तर 32 जणांचा मृत्यु झालेला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular