Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसाधू-महंत रामभक्तांच्या उपस्थितीत रामापूर - पाटण येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन संपन्न.

साधू-महंत रामभक्तांच्या उपस्थितीत रामापूर – पाटण येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन संपन्न.

साधू-महंत रामभक्तांच्या उपस्थितीत रामापूर – पाटण येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन संपन्न.

पाटण:- भारत देश.. धार्मिक आणि अद्यात्मिक संस्कृती पाळणारा देश आहे.. अखंड भारताचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत असल्याचा हा इतिहासीक योग आणि वेळ साधत रामापूर – पाटण येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत असल्याने हा पाटण नगरीचा आनंददायी इतिहासीक क्षण ठरला आहे. या इतिहासीक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य पाटण तालुक्यातील साधू-महंतासह रामभक्तांना मिळाला. रामापूर येथील हे श्रीराम मंदिर उभारणीस सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन शिवाचार्य निलकंठ धारेश्वर महाराज यांनी राममंदिर भूमिपूजन प्रसंगी केले.
यावेळी शिवानंद महाराज मणेरी मठ, नाना महाराज फुके रासाटी मठ, भाजप प्रवक्ते भरत पाटील, सातारा जि.प. माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, व्दारकोजीराव पाटणकर (कांता सरकार), मणसे ता.अध्यक्ष गोरख नारक, भाजप ता. अध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, उदयसिंह पाटणकर, शिवसेना शहर प्रमुख शंकरराव कुंभार, उपशहर प्रमुख महादेव खैरमोडे, वैभव पाटणकर, अनिल भोसले, पंकज नायकवडी, पंडीतराव मोरे, रावसाहेब क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रामापूर येथील मंदिराची प्रार्श्वभुमी सांगताना विक्रमबाबा पाटणकर म्हणाले रामापूर येथे जुने पुरातन श्रीराम मंदिर होते. या मंदिरात सांस्कृतिक व धार्मिक परंपरा राखली जात होती. कालांतराने हे मंदिर १९६७ च्या भुकंपात पडले असताना येथील श्रीरामाच्या मूर्ती रामापूर येथील हणमंतराव पाटणकर यांच्या जुन्या वाढ्यात ठेवण्यात आल्या. आज हि याची देखरेख पुजापाठ व्दारकोजीराव पाटणकर (कांता सरकार) करत आहेत. मंदिराच्या मुळ ठिकाणी येथील नागरिक श्रध्देने नतमस्तक होतात. या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी येथील स्थानिक नागरिकांची अनेकवर्षा पासूनची इच्छा आहे. योगायोगाने संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन बुधवार दि.- ५ औगस्ट रोजी होत असताना हा इतिहासीक क्षण साधत रामापूर – पाटण येथील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन घेण्याचा निर्णय येथील स्थानिक नागरिकांनी घेतला आहे. हे भूमिपूजन साधू महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोयना, मोरणा, केरा, वांग, तारळी, उत्तर मांड आणि धारेश्वर तीर्थ या सप्त गंगेचा श्रीरामाला अभिषेक घालून सोशल डिस्टींगक्षणचे नियम पाळून झाला असल्याचे असे विक्रमबाबा पाटणकर यांनी सांगितले.
यावेळी कारसेवक- काशिनाथ विभुते, बाळासाहेब खांडके, दिपकराव बेडके, लक्ष्मण चव्हाण, संजय शिंदे, यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

फोटो- श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करताना निलकंठ धारेश्वर महाराज, शिवानंद महाराज, नानामहाराज फुके शेजारी विक्रमबाबा पाटणकर, व्दारकोजीराव पाटणकर आदी..

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular