वार्ताहर
परळी
सातारा जिल्हय़ातील कोरोनाचा उद्रेक हा सगळय़ांनाचा अनुभवयास येत आहे. परंतु परळी खोऱयातील कोरोना हा हद्दपार करण्यात आरोग्य विभागास यश मिळाले होते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून कुस बुद्रुक तसेच आता निगुडमाळ येथे बाधीत आढळल्याने भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
6 ऑगस्ट रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार निगुडमाळ येथील 60 वर्षीय वृध्दास कोरोनाची बाधा झाल्याचे समजले परंतु सदर व्यक्ती ही 21 मे रोजी मुंबईहून आलेली आहे. तसेच त्यानंतर त्यांचा कोणताही प्रवास झालेला नाही. त्यामुळे बाधीत साखळी शोधण्यासाठी आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सदर व्यक्तीस 27 जुलैपासून थोडा फार त्रास जाणवू लागल्याने अखेर 4 ऑगस्ट रोजी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर व्यक्तीह श्वसनास त्रास, सर्दी, खोकला, ताप, जुलाब हि कोरोना सदृश्य लक्षणे आढल्याने कोरोना चाचणी करण्यात आली. 6 ऑगस्ट रोजी आलेल्या रिपोर्टमध्ये सदरव्यक्ती ही बाधीत आल्याने एकच थरकाप उडाला आहे. सदर व्यक्तीच्या हायरिस्कमधील 4 जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले असून 3 जण हे लोरिस्क मध्ये आहेत.

