Tuesday, December 2, 2025
HomeUncategorizedजुने ते सोने' याची आठवण देणारी शिरवडे येथील गौरी सजावट     

जुने ते सोने’ याची आठवण देणारी शिरवडे येथील गौरी सजावट     

सातारा दि : श्रावणाच्या महिन्यात खऱ्या अर्थाने सणासुदीला बहार येतो.त्यातच गौरी -गणपती उत्सव साजरा करणे म्हणजे  महिला वर्गाला अप्रतिम संधी उपलब्ध होते. या संधीचा लाभ घेऊन शिरवडे ता कराड येथे चक्क जुन्या पिढीतील रीतिरिवाजा प्रमाणे घरगुती पद्धतीने गौरी सजावट करून जुने ते सोने याची आठवण करून दिली आहे.

महाराष्ट्र राज्यात खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात सणासुदीच्या काळात मंगलमय वातावरण पसरले जाते. महिलांना शेती व घरगुती उधोगातून सवड मिळते.नवसाला पावणाऱ्या श्री गणराय आगमनाच्या समवेत पै पाहुणे, शेजारी -पाजारी यांचे ही प्रत्येकाच्या घरी आगमन होते. त्यातून गौरी चे स्वागत -सजावट व हळदी कुंकू या कार्यक्रमाला सहभागी व्हावे लागते. याची जाणीव ठेवून शिरवडे ता कराड येथील सौ सुनिता राजेंद्र मार्केळ यांनी गौरी सजावट करताना जुने संदर्भ व त्याचा उपयोग याची सुबक मांडणी केली आहे.             दळण बारीक करून देणारे जाते,भांड्याची जुनी मांडणी, पुरणपोळी, बैलजोडी,गोड, तिखट पदार्थ आणि पाणी पिण्यासाठी तांब्या व फुलपात्र याचा खुबी ने वापर केला. तसेच श्री गणरायाची सुबक मूर्ती सुध्दा बसविली आहे              गौरी सजावटीसाठी त्यांना पती राजेंद्र मार्केळ, मुले रोहित, साक्षी तसेच माधुरी हबे, प्रसाद चौधरी यांच्या समवेत शहीद अशोक कामटे यांचे चालक म्हणून पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले त्यांच्याच नावाचे वडिल अशोक कामटे यांचे ही सहकार्य लाभले आहे. सदरची गौरी सजावट पाहून अनेकांनी कौतुक केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular