Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीसापळा रचून सपोनि अमोल मानेंनी केले गुंड गजा मारणेला जेरबंद ; ...

सापळा रचून सपोनि अमोल मानेंनी केले गुंड गजा मारणेला जेरबंद ; पुणे पोलिसांना चकवा देत झाला होता फरार.

सातारा/ प्रतिनिधी :- पुणे पोलिसांना हवा असणारा पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला मेढा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने जेरबंद केले. फरार झाल्यानंतर त्याचे वास्तव्य मेढा, वाई, महाबळेश्वर परिसरात वास्तव्य होते. शनिवारी मेढय़ात डस्टर गाडीतून फिरत असल्याची माहिती मिळताच मेढय़ाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी सापळा रचत गुंड गजा मारणेच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत अधिक माहिती अशी, तळोजा जेलमधून निर्दोष सुटलेल्या गजा मारणे याने जेलमधून शक्ती प्रदर्शन करत महामार्गावर धुडगूस घातला होता. त्याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला पुन्हा अटक करण्यासाठी यंत्रणा लावली होती. मात्र पुणे पोलिसांना गुंगारा देत गजा मारणे हा फरार झाला होता. जावळी तालुक्याच्या हद्दीमध्ये मेढा पोलिसांनी त्याला शनिवारी रात्री जेरबंद केले.

फरार गजा मारणे महाबळेश्वरच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून फिरत असल्याची माहिती देखील समोर येत होती. मात्र शनिवारी जावळी तालुक्यातील मेढा परिसरात गजा मारणे आला असल्याची खबर पोलिसांना लागली आणि मेढा शहरात डस्टर गाडीतून फिरत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी फरार कुख्यात गुंड गजा मारलेला सापळा रचत जेरबंद केले.

खूनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणे याची तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. यातच शक्तिप्रदर्शनावर विधान परिषदेत लक्षवेधी झाली व त्यानंतर पुणे पोलिसांवर माध्यम व सामाजिक स्तरातून टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आपल्याला अटक होणार हे लक्षात आल्यानंतर गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. तो थेट महाबळेश्वर, वाई परिसरात गेल्या काही दिवसांपासून फिरत होता. डस्टर गाडीतुन मेढा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळताच डस्टर गाडीमध्ये गजा मारणे आहे याची खात्री पटताच फिल्मी स्टाईल गजा मारणेला मेढा पोलिसांनी सरेंडर होण्याची सुरुवातीला पूर्वसूचना केली. व त्यानंतरच गजा मारणे फिल्मी स्टाईलने मेढय़ामध्ये जेरबंद झाला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular