पाटण:- फुलराणी बाल मंदिर पाटण येथील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुहासिनी पिसाळ यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समर्थ सुहास चैरिटेबल ट्रस्टच्या ॲम्बुलन्स साठी पाच हजार रुपये चा धनादेश ट्रस्टचे अध्यक्षा डॉ. सौ. शुभांगी घाडगे यांच्याजवळ प्रधान केला. तर श्रीमती सुहासिनी पिसाळ आई यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांनी पाटण येथील कोरोना सेंटर मधील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्यासाठी मोफत जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. माता – पुत्र पिसाळ यांच्या सामाजिक दातृत्वावर सर्व स्तरातून धन्यवाद मानले जात आहेत.
श्रीमती सुहासिनी पिसाळ या फुलराणी बाल मंदिर पाटणच्या संस्थापक आदर्श शिक्षिका आहेत. बालमनावर बालसंस्कार करत गेली चाळीस वर्षे त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. आयुष्याच्या ६८ व्या वर्षी हि त्यांचे ज्ञानदानाचे कार्य अविरत चालू आहे. प्रत्येक वर्षी वाढदिवसाला स्वखर्चातुन शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करतात. मात्र वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बालमंदिर बंद असल्याने हा निधी त्यांनी समर्थ सुहास चैरिटेबल ट्रस्टच्या ॲम्बुलन्स साठी पाच हजार रुपये चा धनादेश ट्रस्टचे अध्यक्षा डॉ. सौ. शुभांगी घाडगे यांच्याजवळ प्रधान केला. तल वाढदिवसिचे औचित्य साधून श्रीमती सुहासिनी पिसाळ यांचे पुत्र व सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांनी पाटण येथील कोरोना सेंटर मधील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्यासाठी मोफत जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम जो पर्यंत कोरोना सेंटर चालू आहे. तो पर्यंत सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. माता – पुत्र पिसाळ यांच्या सामाजिक दातृत्वावर सर्व स्तरातून धन्यवाद मानले जात आहेत. धनादेश प्रधान करतेवेळी यशवंतराव जगताप, पत्रकार शंकर मोहिते, शिवप्रेमी मनोहर यादव, लक्ष्मण चव्हाण, सूर्यकांत घाडगे आदी उपस्थित होते.
आईच्या वाढदिवसानिमित्त कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण ; सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांचा उपक्रम ; रुग्णांच्या सेवेत येणाऱ्या नवीन ॲम्बुलन्स साठी आई कडून देणगी
RELATED ARTICLES