Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीकोविड लसीकरण ऑनलाइन नोंदीचा जावलीकरांना फटका ; लसीकरणाला तालुका बाहेरील नागरिकांची गर्दी...

कोविड लसीकरण ऑनलाइन नोंदीचा जावलीकरांना फटका ; लसीकरणाला तालुका बाहेरील नागरिकांची गर्दी ; प्रशासनाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा ; स्थानिक नागरीकांची मागणी

मेढा ( अभिजीत शिंगटे ) :- सध्या कोविड लसीकरण रजिस्ट्रेशन चालू असल्याने याचा लाभ पर गावातील नागरीकांना मिळत असून स्थानिक रहिवाशी यांना मात्र लसीचा तोटा सहन करावा लागत  आहे. त्यामुळे समस्त जावलीकरांमधून नाराजीचा सुर उमटत आहे.
मेढा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून मोठी बाजारपेठ असणाऱ्या मेढा आणि जावलीकरांना अद्यापही लसीकरण मोहीमेपासून लांबच रहावे लागत असल्याने नागरीकांतून मोठया प्रमाणातुन नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने १८ते ४४ वयोगटातीत नागरीकांना लसीकरण करता यावे म्हणून रजिस्ट्रेशन करण्याच्या सुचना दिल्या गेल्या परंतु याचा फायदा मात्र बाहेरील नागरीकांनाच मोठ्या प्रमाणात होत असून जावली तालुक्यातील नागरीकांवरच अन्याय केला जात असल्याच्या भावना नागरीकांतुन व्यक्त केल्या जात आहेत .
जेव्हा कोव्हीड लसीचा डोस बुक करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळी काही वेळातच याचे शेडूल फूल होत आहे.ग्रामीण भागातील नागरीकांना मुळातच रजिस्ट्रेशन आणी बुकींग याबाबत माहिती मिळत नसल्याने रजिस्ट्रेशन करताना अडचणी निर्माण होत आहेत. मेढा ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध असल्या तरी त्यांचेकडे येणारी लिस्ट २०० नागरीकांची असल्याने त्याप्रमाणे लसीकरण केले जात आहे. मात्र यात स्थानिक आणी बाहेरचे असा भेदभाव केला जात नसला तरी या ग्रामीण रुग्णालयाचा फायदा नक्की कोणाला ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोव्हीड लसीकरणाचा टप्पा पार पाडताना लहान मूले, युवकवर्ग,महिला, पुरुष असा वर्ग क्रम भविष्यात राबवला जात असताना या भागातील नागरीकांचा प्राधान्याने विचार केला जावा आणि प्रत्येक विभागातील ग्रामीण रुग्णालयातून यांना सेवा मिळावी अशी अपेक्षा असून कोव्हिड लसीकरण माध्यमातुन सर्वांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

कोव्हीड लसीकरण मोहीम राबवली जात असली तरी याचा लाभ ग्रामीण भागातील तळागळातील नागरीकांना होणे गरजेचे असून याबाबत जावलीचे तहसिलदार, गटविकास अधिकारी. आरोग्य अधिकारी यांनी लक्ष घालावे आणि समस्त जावलीकरांना न्याय मिळावा अशी मागणी नागरीकांतून व्यक्त होत आहे.

डॉ. चंद्रकांत यादव (मेढा ग्रामीण रुग्णालय )

– कोव्हीड लसीकरण मोहीम राबवली जात असताना जावलीतील नागरिकांवर कोणताही अन्याय केला जाणार नाही प्रत्येक ठिकाणी आरोग्य सेवा कर्मचारी आपले काम चोख बजावतील. रजिस्ट्रेशन बाबत वरिष्ठ अधिकारी यांचेशी संपर्क साधला असून या बाबत योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular