Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीपेट्रोल ने गाठली शंभरी... आता मात्र आपली सायकलच लय भारी

पेट्रोल ने गाठली शंभरी… आता मात्र आपली सायकलच लय भारी

मेढा ( वार्ताहर ):- पेट्रोल ने शंभरी चा आकडा पार केल्याने गडया आपली सायकलच लय भारी अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
सर्वत्र कोरोना संक्रमणाचा काळ सुरू असून या त्रासाने नागरिक त्रस्त झाले असतानाच नुकत्याच हाती आलेलया वृत्तानुसार पेट्रोलच्या लिटरीने शंभरी पूर्ण केल्याने वाहन चालकात नाराजीचा सुर उमटत आहे. पेट्रोल डिझेल इंधनाचे दर वाढत असल्याने या सरकारचे करायचे काय ? हा प्रश्न नागरीकांना सतावत आहे.एकीकडे कोरोनाचे सावट आणि आता इंधन दरवाढ यामुळे आपली अर्थव्यवस्था कशी टिकणार हा प्रश्न निर्माण होत असून वाढत्या दरवाढीने नागरीकांचे कंबरडे मोडल्या शिवाय राहणार नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे.
ग्रामीण / शहरी भागात व्यायाम करणे कामी सायकलींग करणे महत्वाचे झाले असून वाढत जाणारी इंधन वाढ मुळे नागरीकांनीही आपला मोर्चा सायकल चालवणेकडे वळविला आहे. पेट्रोल, डिझेलची गरज शेती करीता होत असून आता होत असलेल्या लॉक डाऊनमुळे शेतीला मिळणारे पेट्रोल याचा नक्की वापर शेती करताच होणार का ?हे पहावे लागणार आहे. नागरिकांना पेट्रोल दरवाढीचा त्रास होत असून आता गडया आपली सायकलच बरी अशी चर्चा सुरू आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular