Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीकोव्हिड सेंटरच्या माध्यमातुन जनतेला आरोग्य सुविधा मिळणार :- माजी आ. सदाशिव (...

कोव्हिड सेंटरच्या माध्यमातुन जनतेला आरोग्य सुविधा मिळणार :- माजी आ. सदाशिव ( भाऊ) सपकाळ ; मेढयातील विद्यार्थी कोव्हीड सेंटरची माजी आमदार सदाशिव ( भाऊ ) सपकाळ यांचेकडून पाहणी

मेढा ( वार्ताहर ) – मेढा येथे सुरू होत असलेल्या विदयार्थी कोव्हीड सेंटरच्या माध्यमातुन जनतेला आरोग्य सुविधा मिळतील असा विश्वास जावलीचे माजी आमदार सदाशिव ( भाऊ ) सपकाळ यांनी व्यक्त केला.
मेढा येथे होत असलेल्या विद्यार्थी कोव्हिड सेंटर ची पाहणी करत असताना ते बोलत होते यावेळी जावली प्रांताधिकारी टोणपे साहेब ,जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतिश बुध्दे, मेढ्याचे स. पो.नि. अमोल माने, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. चंद्रकांत यादव, जि.प शाळा मेढा माजी मुख्याध्यापक सुरेश शेलार ( गुरूजी ) , प्राथमिक शिक्षक संघ माजी तालुका अध्यक्ष रघुनाथ दळवी ( गुरुजी ), शिवसेना मेढा शहर अध्यक्ष सचिन जवळ , सामाजिक कार्यकर्ते संजय सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक बोलताना त्यांनी सांगितले की जावली हि शुर विरांची भूमी आहे. अनेक ऐतिहासीक लढाईची जावली साक्षीदार आहे आणि आता संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट असताना जावलीतुन हि लढाई सर्वांच्या एकजुटीने लढण्यास जावलीचा आरोग्य विभाग सज्ज झाला असून सर्वांचे सहकार्याने जावलीतुन कोरोना हद्दपार करण्याची संधी मिळाली आहे.
या ठिकाणी उपलब्ध होत असणारी आयसोलेशन सुविधा व ऑक्सिजन सेवेकरीता लोकसहभागातुन ,सर्वच स्तरातुन मिळणारी मदत वाखाणण्याजोगी असून शासकीय स्तरावरून लागणारी मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आणि समाजकार्याकामी लोकवर्गणीतुन उभारलेले हे कोरोना सेंटर जावलीत आदर्शवत विद्यार्थी कोरोना केंद्र म्हणून निश्चितपणे यश मिळवेल असे सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular