Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भावी पिढीला मिळणार ५३ वृक्षाची फळे आणि ऑक्सिजन

ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भावी पिढीला मिळणार ५३ वृक्षाची फळे आणि ऑक्सिजन

 

अजित जगताप

वडूज दि :१४   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व युवकांचे लाडके नेते राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खटाव तालुक्यातील वडूज परिसरात मनसे रोजगार विभाग जिल्हा अध्यक्ष सुरज लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत ५३ जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच  गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.यामुळे भावी पिढीला वृक्षांची फळे व ऑक्सिजन मिळणार आहे.

सन्मानीय मनसे नेते राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणी ही पोस्टर बाजी,जाहिरात बाजी न करता आपापल्या घरी बसून काळजी घ्यावी तसेच गरजूंना मदत करावी याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत असा आदेश दिला होता. त्याची निष्ठावंत मनसे सैनिक म्हणून आदेशाचे पालन केले आहे. मनसेचे धाडसी योद्धा राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंच, जाभूळ वड, पीपल,पेरू,आंबा अश्या ५३ जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.  येरळा नदीकाठ, स्मशानभूमी परिसरात ऑक्सिजन देण्याऱ्या वृक्षांची लागवड केली. तालुक्यातील एका नावाजलेल्या रोपवाटिकेमधून स्वखर्चाने हे सर्व वृक्ष विकत आणले आहेत. सदर वृक्षांची निगा राखण्यासाठी मनसे सैनिक दर आठवडा किंवा महिन्याच्या प्रत्येक १४ तारखेला सकाळी भेट देणार आहेत. मनसेचे पदाधिकारी  मितेश,खाडे, राहुल शेंडगे,प्रशांत साळुंखे,  युवराज पवार, सूरज लोहार यांच्या सारखे मनसे पदाधिकारी हे  पक्षवाढीसाठी विविध उपक्रम राबवतात. त्यामुळे सातारा जिल्ह्यात मनसेची वाटचाल सुरू आहे अशा शब्दात गौरव करण्यात येत आहे.

सामाजिक कार्यात लोकांच्या मदतीला धावून गेल्यास लोक निवडणुकीत विरोधात जात नाहीत याचा अनुभव राजकीय पक्षांनी घेतला आहे . कोरोना संकटात कराड,खटाव, वाई,महाबळेश्वर, पाटण, खंडाळा, जावळी व सातारा व माण तालुक्यात मनसे सैनिकानी केलेल्या कामामुळे मतदार निश्चितच ‘रेल्वे इंजिन’ला मतदान करतील असा विश्वास ज्यांना मदत केली आहे अशा गोरगरिबांनी व्यक्त केला आहे.

या वृक्षारोपण सोहळ्यासाठी  वडूज परिसरातील मनसेचे महेश देसाई,युवा उद्योजक विशाल गोडसे,आदित्य लोहार,वैभव जाधव, दत्ता शिंदे,दिलावर मुल्ला, अहमद काझी,जिजाबा दळवी आदींची उपस्थिती होती

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular