पाटण- (शंकर मोहिते)- कोविड-9 लसीकरण नियोजनच्या अभावामुळे व अपुऱ्या येणाऱ्या लसीकरणासाठी नागरिकांची ग्रामीण रुग्णालया बाहेर पहाटे पासून रांगा लागत आहेत. आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत नागरीकांच्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोवीशिल्ड, कोव्हॅक्शीन या लसीचां अपुरा येणाऱ्या डोस मुळे अनेक नागरिकांना लसीशिवाय परतावे लागत आहे. अनेकदा हेलपाटे मारुन देखील लस मिळत नसल्याने आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त होत असताना डोस वाढवून देण्याची मागणी संतापलेले नागरिक करत आहेत.
बऱ्यापैकी जेष्ठ नागरिकांचे पहिले डोस पुर्णत्वास गेले आहेत. दुसऱ्या डोससाठी दिलेली मुद्दत संपून देखील लस उपलब्ध होत नसल्याने पहिल्या आणि दुसऱ्या डोस मधे बरेच अंतर पडत आहे. कधी
कोव्हॅक्शीन असेल तर कोविशील्ड नाही. कोविशील्ड असेल तर कोव्हॅक्शीन नाही. असले तरी अपुरे डोस येत असल्याने लसीकरणासाठी रुग्णालयात उपस्थित राहिलेल्या अनेकांना डोस मिळत नाहीत. अशी परस्थिती निर्माण झाली आहे. दुसऱ्या डोस साठी नागरिकांची पाटण ग्रामीण रुग्णालया बाहेर पहाटे पासूनच रांगा लागत असून किमान चार-पाचशेच्या वर नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीतील रांगेत असलेल्या शंभर-दिडशे नागरिकांनाच लस उपलब्ध होत असून निम्म्याहून अधिक नागरिकांना लसीशिवाय मोकळ्या हाताने परतावे लागत आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी रांगेत पहिला नंबरसाठी नागरिकांची ग्रामीण रुग्णालया बाहेर गर्दी होत आहे. या गर्दीत अनेकदा नंबर साठी भांडणे देखील होत आहेत. अशा परस्थितीत जेष्ठ नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन आरोग्य विभागाने लसीकरणाचे डोस वाढवून देण्याची मागणी होत आहे.
अपुऱ्या डोसमुळे नागरिकांच्या लसीकरणासाठी पहाटे पासून रांगा ; डोस वाढवून मिळण्याची मागणी.
RELATED ARTICLES