तामकडे एम.आय.डी.सीत शॉक लागून म्हैस ठार

पाटण :- तामकडे एम. आय.डि.सी. येथे विजेची तार तुटल्याने पडलेले विद्युत वाहक तारेचा शॉक लागून काळोली येथील शरद शामराव शेरकर रा. काळोली ता. पाटण या शेतकऱ्याच्या म्हशीचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेली म्हैस गाबण होती. विजेचा धक्का ऐवढा जोरात होता की म्हैसीचे पोठ फुटले. दुधाच्या व्यवसायावर गुजरान चालणाऱ्या शेरकर कुटुंबियांचा आधार गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची तात्काळ दखल घेऊन विज महावितरण कंपनीने शेरकर कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी करण्यात येत आहे.

काळोली येथील शेतकरी शरद शामराव शेरकर रा. काळोली सकाळी ११ वा। सुमारास गुरांना चारण्यासाठी तामकडे येथील एमआयडीसी येथे गेले असताना शेतात पडलेल्या विज वाहिनीचा स्पर्श म्हैसीला होताच विजेचा धक्का लागला. त्यात म्हैस जागीच ठार झाली. हि म्हैस आठ महिन्याची गाबन होती. विजेचा धक्का ऐवढा जोरात होता की म्हैसीचे पोठ फुटून तिचे बाळ बाहेर पडले. या धक्क्याने शेरकर कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले असून दुधाच्या व्यवसायावर या कुटुंबियांची अर्थिक गुजरान होत होती. महावितरण कंपनीच्या निष्क्रियतेमुळे हि घटना घडल्याचीची अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.