Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीमेढा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत यशस्वीरित्या संपन्न विधी सेवा प्राधिकरण चा डिजिटल...

मेढा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत यशस्वीरित्या संपन्न विधी सेवा प्राधिकरण चा डिजिटल प्रयत्न मेढा न्यायालयात लोक अदालत ऑनलाईन पद्धतीने

 

मेढा ( वार्ताहर ) – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि. १ ऑगस्ट,२०२१ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन मेढा येथेऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
कोरोना परिस्थितीमध्ये सामाजिक अंतर राखून व सर्व नियमांचे पालन करून लोकअदालत सुरू करणेत आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन नालासा गीताने करण्यात आले. अध्यक्ष, विधी सेवा समिती, मेढा तथा दिवाणी न्यायाधीश, मेढा श्री. एन. एस. काळे साहेब यांनी लोक अदालती मध्ये तडजोडीने वाद मिटवल्याने वेळेची व पैशाची बचत होते , लोकांना लवकरात लवकर न्याय मिळतो आणि जय पराजय या बाबतची सल मनात रहात नाही, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आपली प्रकरणे तडजोडीने समेट करावीत, असे आवाहन केले आहे. प्रथमच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे मार्फत “सामा” या संस्थेचे सहकार्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात हे लोक अदालत ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनामुळे वयोवृद्ध लोकांना किंवा अन्य कारणाने ज्या लोकांना तडजोडीसाठी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहता येत नाही अशा लोकांनी ऑनलाईन आभासी पद्धतीने किंवा वॉट्स ऍप द्वारे व्हिडिओ कॉल करून आपली संमती दिली तरी प्रकरणे निकाली काढण्यात येतील. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या ऑनलाईन सेवेचाही लाभ घेत आपली प्रकरण निकालात काढावीत असेही सुचित केले
याप्रसंगी अँड श्री. आर. एस. पोफळे, सचिव अॅड .ड श्री. व्ही. बी. विधाते, ज्येष्ठ विधीज्ञ श्री. यू. एन. शिंदे, सदस्य अॅड व्ही. एन. देशमुख, अॅड श्री. व्ही. जी. महाडिक, अॅड श्री. अनिल देशमुख, अॅड. कु. पुनम गोरे व सरकारी वकील सौ. इंगळे, बारचे इतर सदस्य तसेच पक्षकार उपस्थित होते.
या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये प्रलंबित दिवाणी विभागाकडील १२ प्रकरणे त्यापैकी ऑनलाईन पद्धतीने ३ प्रकरणे मिटवली व.रु.७६ हजार एवढी रक्कम वसूल झाली व फौजदारी कडील चेक बाऊन्स व इतर अशी १० प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यापैकी १ प्रकरण ऑनलाईन पद्धतीने निकाली काढण्यात आले व रू. ३लाख,११हजार ४३८ एवढी रक्कम वसूल करण्यात आली.
विशेष बाब म्हणजे दिवाणी विभागाकडील कडील एक १० वर्ष जुने प्रकरण पॅनेल प्रमुख व पॅनेल सदस्य यांच्या योग्य मध्यस्थीने निकाली निघून त्या अनुषंगाने असलेली अन्य २ प्रकरणेही निकाली झाल्यानंतर संबंधित पक्षकार आनंदीत झाले. यावेळी”साधता संवाद, संपतो वाद ” या उक्तीची त्यांना प्रचिती आली.
वादपूर्व प्रकरणामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा यांनी सहभाग घेतला. ८ वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवून त्यामध्ये रुपये ४१ हजार ५०० इतकी रक्कम वसूल करण्यात आली. तसेच कबुली केसेस मध्ये ३१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला व त्यात संबंधितांकडून ५६ हजार ९०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.
या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये एकाच दिवसात मेढा न्यायालयातील एकूण प्रलंबित ५३ प्रकरणे व ८ वादपूर्व अशी ६१ प्रकरणे निकाली होऊन र. रू.४ लाख २८ हजार ९३८ एवढी रक्कम वसूल करण्यात आली.*
लोक अदालत यशस्वी करण्यासाठी मेढा न्यायालयाचे न्यायाधीश श्री. काळे साहेब, बार असोसिएशन चे पदाधिकारी व सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, पोलिस कर्मचारी, तसेच विधी सेवा समिती, मेढा यांनी परिश्रम घेतले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular