सातारा : काही वर्षांपूर्वी श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या छ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय कोविड महामारीच्या काळात सातारा शहरात जम्बो कोविड सेंटर म्हणून प्रशासनाने चालवले. मात्र नंतर स्वच्छता व उर्वरित मटेरिअल न काढता तसेच ठेवून दुर्लक्ष केले गेले.
मात्र कोविड सेंटर बंद झाल्यानंतर स्वच्छता ही करून द्यावयास हवे होते तसे न करता संग्रहालय यंत्रणेकडे तशाच अवस्थेत देण्यात आले ही बाब चुकीची आहे. तसेच सर्व बायो कचरा तसाच असल्याने फार गलिच्छता होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर येसूबाई फौंडेशनच्या माध्यमातून स्वतः लक्ष घालून स्वच्छ्ता करून घेतली असे सुहास राजेशिर्क यांनी सांगितले.