Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीछत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील बायोमेडिकलच्या निर्मूलनासाठी सुहास राजे शिर्के झाले आक्रमक ;...

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील बायोमेडिकलच्या निर्मूलनासाठी सुहास राजे शिर्के झाले आक्रमक ; ठिय्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जिल्हा शिल्लक चिकित्सक घटनास्थळी झाले हजर ; कचरा निर्मूलन करण्याचे दिले आश्वासन

सातारा दिनांक 21 (प्रतिनिधी ) :- छत्रपती शिवाजी संग्रहालयाचा कचरा वैयक्तिक यंत्रणा लावून साफसफाई करणाऱ्या माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के यांनी सोमवारी पुन्हा एकदा येथील बायोमेडिकल वेस्ट निर्मूलनासाठी आक्रमक पवित्रा घेतला . शिवाजी संग्रहालयाच्या पिछाडीला असणाऱ्या शेडमध्ये जैवकचऱ्याचे निर्मूलन गेले सहा महिने होत नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला . राजेशिर्के यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण आणि नेचर इन नीड या संस्थेचे व्यवस्थापक शिरीष दामले यांना तात्काळ घटनास्थळी उपस्थित रहावे लागले .

कचऱ्याचे तात्काळ विलगीकरण करून शास्त्रीय पद्धतीने तो येत्या 24 तासात नष्ट केला जाईल असे आश्वासन डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी सुहास राजे शिर्के यांना दिले . सातारा शहरातील जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत विशेषता छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या विविध प्रश्नांबाबत माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के यांनी जोरदार भूमिका घेतली आहे . राजेशिर्के यांनी पंधरा दिवसांपूर्वी स्वतःची वैयक्तिक यंत्रणा लावून संग्रहालयाची इमारत पूर्णतः स्वच्छ केली होती मात्र संग्रहालयाच्या पिछाडीला असणाऱ्या शेडमध्ये बायोमेडिकल कचरा गेले सहा महिन्यापासून पडून आहे त्याचे तात्काळ निर्मूलन झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता .

जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेची तातडीने संपर्क साधूनही काहीच परिणाम होत नव्हता परिणामी सुहास राजे शिर्के आणि शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे या दोघांनीही यासंदर्भात सोमवारी दिवसभर पाठपुरावा सुरू ठेवला वेळ पडल्यास या प्रश्नासाठी जागेवर ठिय्या आंदोलन करण्याचा खरमरीत इशारा सुहास राजेशिर्के यांनी दिला या गंभीर प्रश्नाची मांडणी त्यांनी दूरध्वनी वरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्याकडे केली तसेच नेचर इन नीड या ठेकेदार संस्थेचे व्यवस्थापक शिरीष दामले यांनाही तेथे उपस्थित रहावे लागले. राजे शिर्के यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे डॉक्टर सुभाष चव्हाण आणि दामले यांनी तात्काळ या प्रश्नात लक्ष घालून येथील बायोमेडिकल वेस्ट चे विलगीकरण केले जाईल वेगवेगळ्या पिशव्यांचा कचरा उचलून बायोमेडिकल वेस्ट चे संवेदनशील जे घटक आहेत ते जाळून नष्ट केले जातील त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल असे आश्वासन डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी सुहास राजे शिर्के यांना दिले

तसेच नगरपालिका यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा यांच्या सहकार्याने संबंधित विभाग तात्काळ सॅनिटाइज केला जाईल असेही डॉक्टर चव्हाण यांनी सांगितले बायोमेडिकल वेस्ट मुळे शिवाजी संग्रहालयाच्या परिसराचे प्रदूषण वाढत आहे हा कचरा प्रकृतीसाठी अपायकारक आहे त्यामुळे या कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावली जावी आणि हा परिसर प्रदूषण मुक्त करावा अशी आग्रही भूमिका सुहास राजे शिर्के यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडली. सातारा शहरातील जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्याकरता सातत्याने आंदोलन करावे लागले तरी मागे हटणार नाही पण सार्वजनिक स्वच्छतेचे प्रश्न सुटलेच पाहिजेत ही एक सामाजिक बांधिलकी आहे हा राजकीय स्टंट नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular