Thursday, June 19, 2025
Homeअर्थविश्व"रचना 2022" बांधकाम विषयक प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात

“रचना 2022” बांधकाम विषयक प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात

सातारा :- बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेने रचना 2022 हे बांधकाम विषयक भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे.  सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपुर्ण पश्‍चिम महाराष्ट्राला भूषणावह ठरेल असे रचना 2022 या प्रदर्शनाचे आयोजन दि. 24 ते 27 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आले आहे. भव्य मंडप, सातारकरांनी न पाहिलेले आकर्षक प्रवेशद्वार, लाईट सिसटीम्स् व आकर्षक स्टॉल्स असे या प्रदर्शनाचे आयोजन असून प्रदशर्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचे बिल्डर्स असोसिएशनचे सातारा शाखेचे अध्यक्ष राजेश देशमुख यांनी सांगितले.
रचना 2022  प्रदर्शनाचे उद्घाटन गुरूवार दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी बिल्डर्स असोसिएशनच ऑफ इंडियाचे नॅशनल प्रेसीडेंट मा.श्री निमिष पटेल यांच्या हस्ते आणि बीएआय चे वेस्ट झोनचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. राजेेंद्र आठवले, महाराष्ट्र स्टेट चेअरमन श्री. दत्तात्रय मुळे, व्ही. बी. व्हेंचर्सचे डायरेयटर श्री. विकास भटेवरा, आयकॉन स्टीलचे मॅनेजिंग डायरेयटर श्री. दिनेश राठी, स्टेट बँक ऑफ  इंडिया चे बिझने ऑफिसर श्री. संजित पाठक व बिल्डर्स असोसिएशनचे चेअरमन राजेश देशमुख, व्हाईस चेअरमन अजिनाथ शिराळ, सेक्रेटरी ओंकार शिंदे, खजिनदार हेमंत दरेकर, कौन्सिल मेंबर श्रीराज दिक्षीत, सचिन देशमुख प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बिल्डर्स असोसिएशन च्या सातारा शाखेचे हे 32 वे वर्ष आहे,  रचना बांधकाम विषयक प्रदर्शन भरवून सर्वसामान्य लोकांना बांधकाम क्षेत्राची, त्यात वापरल्या  जाणार्‍या अनेक मटेरिअल्सची, बांधकामाच्या वेगवेगळया पध्दती, त्यातले तंत्रज्ञान, त्यात वापरली जाणारी वेगवेगळी मटेरिअल्स व या अनुषंगाने गृहअंतर्गत रचना, त्यात उपलब्ध होऊ शकणार्‍या अनेक सुविधा, सुखसोयी हा एक मोठा उपक्रम बिल्डर्स असोसिएशनची सातारा शाखा यशस्वीपणे राबवीत आहे. रचनाच्या यशस्वी आयोजनाचे हे बारावे वर्ष आहे. लोकांकडूनही या उपक्रमाला वाढता प्रतिसाद आहे.  प्रदर्शनास भेट देणार्‍यांची संख्याही दरवेळी वाढत आहे. यावेळी सुमारे तीन लाखापेक्षा जास्त नागरिक  भेट देतील ही अपेक्षा आहे. या वर्षीचा एकूण प्रतिसाद सर्व स्टॉल धारक व भेट देणारे इच्छुक आणि ग्राहक यांना अडचणीचे होऊ नये म्हणून रचना 2022 हे भव्यदिव्य बांधकाम विषयक प्रदर्शन सैनिक स्कुलच्या भव्य मैदानावर घेण्यात आले आहे. रचना चे खास वैशिष्ठय धुळीचा त्रास होऊ नये म्हणून संपुर्ण मांडवात कार्पेट  आहे. तसेच सुसज्ज पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
रचना 2022 या प्रदर्शनामध्ये एकूण 120 हून अधिक स्टॉल्स्चे नियोजन केले आहे. यामधे नामांकित बांधकाम व्यावसायिक आपले नवीन प्रकल्प सादर करणार आहेत. या प्रदर्शनामध्ये बांधकामास उपयुयत विविध मटेरियल्स् पाहण्यात मिळतील. तसेच बांधकाम क्षेत्राशी संबंधित अत्याधुनिक मशिनरी ठेवण्यात येणार आहेत. प्रदर्शनाच्या कालावधीमध्ये विविध आकर्षक योजना बांधकाम व्यावसायिक जाहीर करणार आहेत.यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे.  नवीन फ्लॅटसाठी नोंदणी करणार्‍या ग्राहकांच्या सेवेत नामवंत वित्तीय संस्था उपलब्ध आहेत.  एकाचवेळी एकाच ठिकाणी घर व बांधकाम साहित्य निवडींचे विविध पर्याय ग्राहकांना बघावयास मिळणार आहेत.
रचना 2022 हे प्रदर्शन दि. 24 ने 27 नोव्हेंबर 2022 दरम्यान आयोजीत केले असून प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 असून प्रवेश विनामुल्य आहे.   रचना 2022 चे प्रायोजकत्व विकास भटेवरा व्हेंचर , आयकॉन स्टील व स्टेट बँक ऑफ  इंडिया यांनी स्वीकारले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular