मेढा प्रतिनिधी – मेढा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इम्रान अल्ताफ आतार (भाईजान) यांची मेढा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये जावली तालुका राष्ट्रवादी युवक च्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वितरण कार्यक्रम आ. शशिकांतजी शिंदे यांचे शुभहस्ते , अमितदादा कदम यांच्या उपस्थीतीमध्ये संपन्न करण्यात आला होता.या वेळी सुरेश पार्टे, चंद्रकांत गवळी, साधू चिकणे, अशोक गोळे , प्रमोद जाधव,युवकचे अध्यक्ष आतिष कदम, संंदीप पवार,यांच्यासह जावली तालुक्यातील विविध विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.
इम्रान आतार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विविध कार्यक्रमात महत्वाची भुमिका बजावली असल्याने त्यांचे कामाचे पोहोच पावती या निवडीमुळे त्यांना मिळाली असल्याचे मत जावली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,आणि मित्र परिवार यांचेकडून बोलले जात असून त्यांच्या निवडीने
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,आणि मित्र परीवार यांच्यातून आनंद व्यक्त केला जात आहे.
जावली तालुक्याचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांनी आणि पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास हा मला नेहमी प्रेरणा देणारा आहे. या निवडीमुळे माझे काम अधिक वाढले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि युवक वर्ग यांचे सोबत काम करताना अनुभव मिळणार आहे.
इम्रान अल्ताफ आतार
मेढा युवक अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष